Beed News: अरेरे! जावयासाठी अंगठी लपवलेला “धोंडा” मांजराने खाल्ला; पुढं जे घडलं.. जीव गेला, ऑपरेशन केलं अन्...

बीडमध्ये आपल्या जावयासाठी केलेला धोंडा मांजरीने खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. या विचित्र घटनेची जिल्हाभरात चर्चा होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड:

Beed News:  जावयासाठी सोन्याची अंगठी असलेला धोंडा मांजरीने खाल्ल्याची घटना बीडमधून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही अंगठी बाहेर काढण्यासाठी मांजरीला उलटीचे औषध दिले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. शेवटी जावयाला कपड्याच्या अहेरावर समाधान मानावे लागले. या विचित्र घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Jalgaon Accident: ST बस, कार, दुचाकीचा भीषण अपघात, 5 जणांचा दुर्दैवी अंत, साखरपुड्याला निघाले अन्...

धोंड्याची अंगठी मांजरीच्या पोटात... 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  सध्या अधिकमास सुरू आहे आणि या अधिकमासात जावयाचा मोठा मान असतो.प्रत्येक सासरा आपल्या जावयाला सोन्याच्या स्वरूपात काहीतरी वस्तू देत असतो. मात्र बीडमध्ये आपल्या जावयासाठी केलेला धोंडा मांजरीने खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. या विचित्र घटनेची जिल्हाभरात चर्चा होत आहे. 

Advertisement

धोंड्याच्या महिन्यासाठी आलेल्या जावयाला सरप्राईज देण्यासाठी अंगठी धोंड्यात ठेवून तो इतर धोंड्यांसोबत ठेवला. मात्र स्वयंपाकानंतर आवराआवरी सुरू असताना घरात आलेल्या मांजरीने नेमका तोच धोंडा स्पष्ट केला त्यामुळे घरच्यांची धांदल उडाली. मग काय अंगठी परत मिळावी म्हणून मांजरीला चक्क चार दिवस घरात बांधून ठेवण्यात आले. 

तसेच विष्ठेद्वारे अंगठी बाहेर पडेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने तिला पशुवैद्यकाकडे नेऊन उलटीसाठी औषधे देण्यात आले परंतु मांजरीला उलटी झाली नाही उलट त्यात मांजरीचा जीव गेला. त्यानंतर मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया करून सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली. या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. 

Hingoli News: संतापजनक! 5 दिवसांचे अर्भक झुडपात फेकलं, निर्दयी माता- पित्याचा शोध सुरु