Accident News: कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झालाय. तर, एक जण गंभीर जखमी झालाय. हा भीषण अपघात मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा (Bhandara News)शहराजवळील बेलाजवळ रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाईही करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चौघांचा घटनास्थळी मृत्यू, चालक गंभीर जखमी
समोर आलेल्या माहितीनुसार, रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे.
घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली. घटनेची माहिती मिळतात भंडारा पोलीस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तर अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली. शिलेंद्र बघेल, शैलेश गोकुळपुरे, विनोद बिनेवार, अशोक धैरवाल अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर अविनाश नागतोडे हा चालक जखमी झाला आहे.
दरम्यान, जळगावमध्ये मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका नगर स्टॉप जवळ ट्रकने कट मारल्याने एसटी बस खड्ड्यात कोसळली असून सुदैवाने झाडाझुडपात मध्ये ही बस अडकल्याने मोठा अपघात टळला आहे. निंभोराकडून जळगावकडे ही बस येत असताना ट्रकने अचानक कट मारल्याने एसटी बस थेट खड्ड्यात कोसळून झाडाझुडपात अडकली. या बस मध्ये 30 ते 40 प्रवासी हे प्रवास करत होते मात्र सुदैवाने हे प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.