- रिलायन्स जिओ कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या दोघांनी पगारवाढीच्या मागणीसाठी संप केला होता
- कंपनीने मागणी नाकारल्याने त्यांनी ९ फेब्रुवारी रोजी जिओच्या फायबर केबल कापून नेटवर्क सेवा २५८ तास बंद केली
- या नेटवर्क खंडामुळे ५४ टॉवर प्रभावित झाले व जिल्ह्यातील लाखो ग्राहकांना मोबाइल सेवा खंडित झाली
अभय भुते
रिलायन्स जिओ कंपनीकडे पगारवाढीची मागणी केली. संपही केला. परंतु, कंपनीने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी जियो कंपनीच्या मोबाइल टॉवरवरील केबलच कापली. त्यामुळे तब्बल 258 तास नेटवर्क खंडीत राहिले. याचा फटका जिल्ह्यातील लाखो ग्राहकांना बसला त्यातून कंपनीचे तीन लाख रुपयांचे नुकसान ही झाले आहे. या प्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध भंडारा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मनोज राजेंद्र पाटील आणि राकेश धांडे अशी या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
राजेंद्र आणि राकेश हे दोघे जिओ कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कामाला आहेत. काही दिवसांपासून त्यांनी कंपनीकडे पगारवाढीची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने दोन्ही कर्मचारी संपावर गेले होते. तरीही कंपनीकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांनी कंपनीच्या नेटवर्कच्या कामात हस्तक्षेप निर्माण केला. 9 फेबुरवारी रोजी दोन्ही कर्मचाऱ्यांनी रिलायंस जिओ कंपनी मोबाइल टॉवरवरील फायबर केबल कापली. त्यामुळे 54 टॉवरवरील नेटवर्क सेवा 258 तासांसाठी खंडीत झाली.
शिवाय त्यात कंपनीचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सोबतच जिओ कंपनीच्या मोबाइलधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध भंडारा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अचानक मोबाईलचे नेटवर्क गेल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी खळबळ उडाली. नेटवर्क जाण्याचे नक्की कारण ही कोणाला समजत नव्हते. त्यामुळे मोबाईलधारकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र ही बाब लवकरच त्यांच्या ही लक्षात आली.