Bhandup Crime: वर्गातल्या दादागिरीचा राग.. 8 वीतील मुलांनी मित्राला संपवलं, तलावात फेकलं, पुढे जे घडलं..

भांडुपमध्ये राहणाऱ्या सिद्धार्थ लोंढे याच्या तीन अल्पवयीन मित्रांनीच रागाच्या भरात त्याची हत्या केली आणि हा बुडून  भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bhandup Crime:  शाळेमध्ये नेहमी दादागिरी करतो.. म्हणून तीन अल्पवयीन वर्गमित्रांनी आपल्याच वर्गातील मुलाची हत्या केल्याची भयंकर घटना भांडुपमध्ये घडली आहे. या तिघांनी आपल्या वर्गमित्राची हत्या करुन त्याचा मृतदेह तलावात फेकला. सिद्धार्थ लोंढे (वय, १४) असं मृत तरुणाचे नाव आहे. तिघांनीही सिद्धार्थचा बुडून मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलीस तपासात त्यांचे बिंग फुटले.

दादागिरीचा राग, वर्गमित्राचा जीव घेतला

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पवई येथील विहार तलावात १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अपघाती नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. भांडुपमध्ये राहणाऱ्या सिद्धार्थ लोंढे याच्या तीन अल्पवयीन मित्रांनीच रागाच्या भरात त्याची हत्या केली आणि हा बुडून  भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला आहे.

Crime News: आईच्या कुशीतून मुलाला पळवलं, 3 लाखात विकलं, 20 तासांची शोधमोहिम अन् थेट...

सिद्धार्थ लोंढे (१४) हा २२ फेब्रुवारी रोजी दुपारी घराबाहेर खेळायला जातो असे सांगून गेला होता, मात्र तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही. पालकांनी शोध घेऊनही तो न सापडल्याने भांडुप पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी विहार तलावाकाठी सिद्धार्थचे कपडे आणि चपला सापडल्या. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यानंतर सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

पोस्टमार्टमने पर्दाफाश झाला!

सिद्धार्थच्या फुफ्फुसात किंवा पोटात पाणी न आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. शवविच्छेदन अहवालात त्याच्या डोक्याला बोथट वस्तूने गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सिद्धार्थच्या तीन मित्रांना (वय १४ ते १५ वर्षे) ताब्यात घेऊन स्वतंत्रपणे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Advertisement

सिद्धार्थ उद्धट वागत असल्याच्या रागातून त्याला 'धडा शिकवण्यासाठी' मुलांनी त्याला तलावाकाठी नेले. तिथे बांबूच्या काठीने त्याच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. घाबरलेल्या मुलांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिला. या तिन्ही अल्पवयीन आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करून डोंगरी येथील सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

Vasai News: कार्यालयात बोलावलं, बविआच्या कार्यकर्त्याला वळ उठेपर्यंत मारलं; भाजप नगरसेवकावर गुन्हा

Topics mentioned in this article