Eknath Khadse: मोठी बातमी! एकनाथ खडसेंसह पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, प्रकरण काय?

खडसे पती-पत्नी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या वतीने न्यायालयात हजेरीतून सूट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणवार, मुंबई:

Pune Bhosari Land Scam:  पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली मुंबईतील विशेष न्यायालयाने राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले आहे. न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने ही कडक पावले उचलली आहेत.

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ​शुक्रवारी या प्रकरणातील दोषारोप निश्चितीसाठी (Charge Framing) विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रक्रियेसाठी सर्व आरोपींची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, खडसे पती-पत्नी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या वतीने न्यायालयात हजेरीतून सूट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.

Advertisement

Maharashtra Zilla Parishad Elections 2026 Live : जि. प., पंचायत समितीचा 'गड' कोण सर करणार? वाचा सर्व अपडेट

कोर्टाकडून वॉरंट जारी...

मात्र, खासदार आणि आमदारांसाठीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी हा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, आरोपींनी दिलेला सूट अर्ज अत्यंत अस्पष्ट आहे. अर्जामध्ये अनुपस्थितीचे कोणतेही ठोस किंवा वैयक्तिक कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. "न्यायालयीन प्रक्रियेत आरोपींनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.

दरम्यान, मात्र अशा प्रकारे अस्पष्ट कारणास्तव प्रक्रियेत विलंब लावता येणार नाही," असे ताशेरे ओढत न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचे आदेश दिले. यामुळे आता खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.

Pune News: पुणे स्टेशनवर आता नो गर्दी, नो गोंधळ, रेल्वे प्रशासनाचा मोठा 'गेम चेंजर' प्रकल्प! वाचा सविस्तर