रेवती हिंगवे, पुणे: पुणे शहरात सध्या गुलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या नव्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. पुणे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यामधील रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे. या आजाराच्या उपचाराला लाखोंचा खर्च होत असल्याने महापालिकेने त्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. याबाबत आता सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) या आजारावर आता पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. गुलेन बॅरीची वाढती रुग्णसंख्या आणि प्रादुर्भाव लक्षात घेता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
GBS चे पुण्यात 74 रुग्ण आहेत. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर पाच रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. या रुग्णांसाठी 50 बेड तर 15 आय सी यू बेड कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची बैठक घेणार असून या बैठकीत याबाबतची चर्चा होणार आहे.
ज्या खाजगी रुग्णालयात GBS चे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत. नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ रुग्णालय याठिकाणी पालिकेचे अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या ठिकाणी खाजगी दवाखाने रुग्णांची बिल किती घेतात यावर या अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. तसेच पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे.
( नक्की वाचा : Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, महाकुंभात केले पिंडदान, Video )
दरम्यान, आज पुणेकरांना एक गोष्ट सांगायची आहे, जी बी एस रुग्णांची वाढ होते आहे, त्यावर कमला नेहरू पार्क मध्ये रुग्णांना उपचार मिळत आहे, आर्थिक ताण मिळू नये म्हणून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. या आजाराचे नवीन संकट आपल्या आले आहे पण घाबरून जाऊ नका, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांचं सर्वांचे त्यावर लक्ष आहे.