21 days ago

भाजपच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून विधान परिषदेसाठी उमेदवार ठरवण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे, यांच्यासह कोअर कमिटीचे नेते चर्चा करण्याचा अंदाज आहे. 

Mar 15, 2025 18:41 (IST)

महाडच्या वरंध घाटात ST बस पलटली, 15 प्रवाशी जखमी

वरंध घाटात ST बस पलटली झाली. त्यात 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. वरंध घाटात ST बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. अवघड वळणावर बस सुमारे 50 फुट खोल दरीत कोसळली आहे. बस महाडकडे येत होती. 

Mar 15, 2025 17:58 (IST)

युवक काँग्रेसचा पुण्यातील मोर्चा पोलिसांनी अडवला

MPSC मुलांची परीक्षा होत आहे. मात्र निकाल वेळेत लावत नाहीत. नोकऱ्या देत नाहीत. मनमानी कारभार हे सरकार करत आहे, असा आरोप युवक काँग्रेसने केला. बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेसने पुण्यात मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र त्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही मोर्चा काढण्यात आला. शेवटी पोलीसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 

Mar 15, 2025 16:51 (IST)

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांची नावे जनक गावंडे , यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे असून पाच ही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.

Mar 15, 2025 14:44 (IST)

Dombivli News: कोकणातील गुंतवणूकदारांना शेअर गुंतवणुकीत लाखोंचा गंडा

डोंबिवलीसह कोकणातील अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजारात 20 टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूण तालुक्यातील निवळी-कोंडवाडी गावातील एका व्यावसायिकाने हा गंडा घातल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील एका गुंतवणूकदाराने विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Advertisement
Mar 15, 2025 13:54 (IST)

Pune News: काँग्रेसच्या मोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

पुण्यातून निघणाऱ्या युवक काँग्रेस मोर्च्याला पुणे पोलिसांनी नाकारली परवानगी 

युवक काँग्रेस कडून पुणे ते मुंबई असा मोर्चा काढण्यात येणार होता 

बेरोजगारीच्या विरोधात हा मोर्चा मुंबईत विधानसभेवर धडकणार होता 

पण पुण्यातील लाल महल पासून निघणाऱ्या या मोर्च्याला परवानगी नाकारण्यात आली आहे

तर युवक काँग्रेस अजूनही या पदयात्रेवर  ठाम असून संध्याकाळी ४ वाजता लाल महाल पासून ही पदयात्रा निघणार असल्याचं युवक काँग्रेसकडून सांग्यात येत आहे

Mar 15, 2025 12:39 (IST)

सुरुची राड्यावरुन दोन्ही राजेंचे मनोमिलन

सुरूची राडा प्रकरणातील खटल्यात खा उदयनराजे आणि शिवेंद्राराजे सातारा जिल्हा न्यायालयात

2017 साली उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये झाला होता राडा

परस्पर विरोधितील तक्रारी बरोबर पोलिसांनीही केला होता गुन्हा दाखल

Advertisement
Mar 15, 2025 12:38 (IST)

Baramati News: बारामतीत साखर उद्योगाच्या आधुनिकरणासाठी कार्यशाळा, 102 साखर कारखान्यांनी घेतला सहभाग

बारामतीत कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून ऊस उत्पादन किमया व साखर उद्योगाच्या आधुनिकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील 102 साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील,खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, बी.बी. ठोंबरे, प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आदी मान्यवर उपस्थित आहेत.

Mar 15, 2025 12:36 (IST)

Amravati news: अमरावतीत एसबीआय बँकेच्या शाखेला आग, लाखो रुपयांचे नुकसान

* अमरावती जिल्ह्यातील चांदुररेल्वे शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग..

* आगीत लाखो रुपयांचे नुकसान, आगीत लाखोंची कॅश जळाल्याची ही शक्यता...

* एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज..

* घटनास्थळी अग्निशमन विभागाचे पथक दाखल, आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू...

Advertisement
Mar 15, 2025 12:35 (IST)

Pune News: पुण्यातील जलवाहिन्यांची रोबोद्वारे तपासणी, महापालिकेचा निर्णय

जलवाहिन्यांची तपासणी ‘रोबो’द्वारे

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रयोग सुरू

पुणे शहरातील जुन्या जलवाहिन्यांची तपासणी ‘रोबो’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

सांगली-कुपवाड महापालिकेकडून पहिल्यांदा अशी तपासणी करण्यात आली होती. 

हा प्रयोग पुण्यात राबविण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरू केला आहे.

या नवीन तंत्रज्ञानामुळे रोबोवर अत्याधुनिक कॅमेरे असणार आहेत. 

यामुळे जलवाहिनीमध्ये होणारी गळती, अनधिकृत, अधिकृत नळजोड, जलवाहिनी आतमध्ये खराब झाली आहे का, याची संपूर्ण माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळणार आहे. 

Mar 15, 2025 12:33 (IST)

Kolhapur Accident: कोल्हापूरमध्ये हिट अँड रन, भरधाव कारने 9 वाहनांना उडवले

भरधाव  चारचाकीने नऊ वाहनांना दिली धडक 

 टेंबलाईवाडी  उड्डाणपूल नजीकच्या परिसरात घटना

घटनेच सीसीटीव्ही फुटेज 

रात्री दोनच्या सुमारास घटना 

 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

Mar 15, 2025 10:04 (IST)

LIVE Update: मोठी बातमी! स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी नागपूर महामार्ग रास्ता रोको आंदोलनापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत राजू शेट्टी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

Mar 15, 2025 09:34 (IST)

Sharad Pawar News: आज शरद पवार बारामतीत ! गोविंद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना भेटण्याकरिता आज बारामतीच्या गोविंद बागेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांसोबत युवा नेते युगेंद्र पवार देखील गोविंद बागेत शरद पवार यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे सध्या हा कारखाना अजित पवार यांच्या ताब्यात आहे शरद पवार निवडणुकीमध्ये पॅनल उभा करणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Mar 15, 2025 08:43 (IST)

Pune News: पुणे शहरात बुलेट चालकांना पोलिसांचा दणका

पुणे शहरात बुलेट चालकांना पोलिसांचा दणका 

पुणे वाहतूक पोलिसांनी 1 हजार 768 बुलेट मॉडीफाय सायलेन्सर केले नष्ट

पुणे शहर वाहतूक शाखेकडून बुलेट मॉडीफाय सायलेन्सरच्या कर्कश आवाजावर कारवाई 

शहरात बुलेटच्या कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे 

शहरात सायलेन्सर विक्री करणाऱ्या व्यापारांवर देखील होणार कारवाई

Mar 15, 2025 08:42 (IST)

Pune LIVE: तुकाराम बीजसाठी PMPL प्रशासन देखील सज्ज

तुकाराम बीज साठी PMPL प्रशासन देखील सज्ज 

तुकाराम बीज देहू गावासाठी सोडण्यात येणार जादा बसेस

देहू गावासाठी पीएमपीएल सोडणार 30 जादा बसेस

15,16 आणि 17 मार्च रोजी सोडण्यात येणार या जादा बसेस 

येत्या 16 मार्च रोजी देहू गावात साजरी होणार तुकाराम बीज

Mar 15, 2025 08:41 (IST)

Kolhapur News: बिबट्याचे कातडे विक्री करणारांवर कारवाई

बिबट्याचे कातडे विकण्यासाठी आलेल्या चंदगड तालुक्यातील दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. तपोवन मैदान येथे झालेल्या या कारवाईत संशयितांकडून बिबट्याचे कातडे, दुचाकी आणि दोन मोबाइल जप्त करण्यात आलेत. धाकलू बाळू शिंदे आणि बाबू सखाराम डोईफोडे अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. जप्तीचा पंचनामा करून दोन्ही संशयितांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी बिबट्याची शिकार कुठे केली, याची चौकशी सुरू आहे

Mar 15, 2025 07:50 (IST)

Solapur News: बिबट्याशी झटापट, पाच तरुण जखमी

कर्नाटकातील सीमावर्ती भागात महिन्याभरापासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला शुक्रवारी तरुणांनी पकडले. 

चडचण तालुक्यातील लोणी आणि मणअंकलगी शिवारात बिबट्याला जीवाची परवा न करता तरुणांनी धाडसाने पकडले. हलसंगीसह या दोन्ही गावच्या तरुणांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. बिबट्याला विजयपूर वन विभागाने ताब्यात घेतले.

Mar 15, 2025 07:19 (IST)

Nagpur News: धक्कादायक! सुनेला ठार करण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्याविरोधात गुन्हा

नागपूरच्या हिंगणा परिसरात  विजेचा शॉक देऊन सासू-सासऱ्याने सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हिगणा एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा मार्गावरील अष्टविनायकनगर येथे ही घटना  घडली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

Mar 15, 2025 07:17 (IST)

Jalgaon News: डंपर उलटून अपघात, डंपर चालक जखमी

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातल्या लोणवाडी जामठी रस्त्यावर डंपर पलटी होऊन अपघात झाला असून या अपघातात डंपर चालक हा गंभीर जखमी झाला आहे. लोणवाडी - जामठी रस्त्यावर असलेल्या नाल्याच्या अरुंद पुलाचा अंदाज न आल्याने नाल्याच्या पुलावरून डंपर उलटून हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Mar 15, 2025 07:16 (IST)

Jalgaon News: धोनखेडा शिवारात काढणी केलेला हरभरा अज्ञात चोरट्यांनी केला लंपास

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातल्या धोनखेडा शिवारात शेतात काढणी केलेला हरभरा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असून काढणी केलेला हरभरा चोरट्यांनी लंपास केल्याने दोन ते तीन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान शेत शिवारात चोरीच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

Mar 15, 2025 07:15 (IST)

Akola News: अकोला जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना मदतीचा दिलासाः 20 प्रकरणे पात्र

अकोला जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, अकोट, तेल्हारा, मुर्तीजापूर आणि अकोला तालुक्यांतील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी आहे.. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 30 प्रकरणांपैकी 20 शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीस पात्र ठरवण्यात आलेए.. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक संकटाने त्रस्त शेतकऱ्यांसाठी ही मदत मोठा आधार ठरणार आहेये.. दरम्यान जिल्ह्यातील 8 प्रकरणे अपात्र ठरली असून 2 ची फेरचौकशी होणार आहे. मदतीने शेतकरी कुटुंबांना नवा आशावाद मिळणार आहे.

Mar 15, 2025 07:14 (IST)

Live Updates: शिर्डीत होणार तेरावे आखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

अधिवेशन नगरी होवू पाहणा-या साईबाबांच्या शिर्डीत दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच आयोजन केल जातय.. येत्या 22 आणि 23 मार्च रोजी हे संमेलन घेतल जाणार असून दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर मंत्र्याचा सहभाग असणार आहेत.. याच बरोबर  नऊ राज्यातून आणि महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून पंधरा हजार वारकरी उपस्थित राहणार आहेत 

Mar 15, 2025 07:13 (IST)

Beed News: बीडनंतर बार्शीमध्येही तरुणावर प्राणघातक हल्ला

- बीडनंतर बार्शी शहरातही टोळक्याकडून तरुणावर हल्ला, सर्व घटना CCTV कॅमेरात कैद 

- भावाला खुन्नस देऊन बघतो या रागातून एका तरुणावर चार जणांकडून जीवघेणा हल्ला 

-मांगडे चाळ परिसरात 11 मार्चच्या 8.30 रात्री हा थरारक प्रकार

- तक्रारदार रामेश्वर रामगुडे आणि त्यांचा मावस भाऊ सोमनाथ शिंदे घरासमोर बसलेले असताना दुचाकीवर येऊन करण्यात आली मारहाण..

Topics mentioned in this article