Mumbai Water Cut: मुंबईकरांनी लक्ष द्या! 17 वॉर्डात 15 टक्के पाणीकपात, तुमचा परिसर आहे का? लगेच चेक करा

मुंबई जलविभागाचे एक पथक भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातील वॉटर प्लांट चौकी येथे कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भुपेंद्र अंबवणे, मुंबई:
Mumbai News Water Cut in 17 Wards:
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. मुंबई जलविभागाचे एक पथक भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातील वॉटर प्लांट चौकी येथे कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे.

या आवश्यक दुरुस्तीच्या कामामुळे, सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील १७ वॉर्डांमध्ये १५% पाणीकपात लागू केली जाईल. ही पाणीकपात मुंबई शहर विभागातील अनेक भागात, पूर्व उपनगरांमध्ये आणि पश्चिम उपनगरांमध्ये लागू असेल.

VIDEO: 'मार खायचा नाही', आगरी समाज एकवटला! 'त्या' घटनेनंतर गावागावात मिटिंग अन् थेट इशारा

या भागात होणार पाणीकपात...

मुंबई शहर: अ, क, ड, ग दक्षिण, ग उत्तर वॉर्ड
पूर्व उपनगरे: एन, एल, एस वॉर्ड
पश्चिम उपनगरे: एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर उत्तर, आर मध्य वॉर्ड

बृहन्मुंबई महानगरपालिकेने या भागातील रहिवाशांना या कालावधीसाठी आगाऊ पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचे आणि ८ आणि ९ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत सावधगिरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीतपणे पूर्ववत करण्यासाठी महानगरपालिकेने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

तानसा लाईन 2750 MM ची आहे ती 3000 MM ने वाढ करत आहोत त्यासाठी काम चालू आहे. आयशूलेशनच्या कामामध्ये पर्टीक्युलर ठिकाणी आपण पाणीपुरवठा खंडित करून दुसऱ्या टनेल्स लाईन आहेत त्यात आपण डायव्हर्ट करतोय. यामुळे मुंबईला होणारा पाणीपुरवठा 15 टक्के कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येत आहे आज काम सुरू आहे, त्यामुळे आतापासून उद्या सकाळपर्यंत पाणी पूर्णपणे खंडित केले जाईल.24 तासात पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

Manoj Jarange: 'धनंजय मुंडेंनी माझी अडीच कोटींची सुपारी दिली होती'; मनोज जरांगेंचा पुन्हा गंभीर आरोप

Topics mentioned in this article