Dahisar News: प्रचाराला विरोध, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोघांना मारहाण, लाथाबुक्क्यांनी तुडवलं

प्रचाराला विरोध केल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोघांना बेदम मारहाण केल्याचा धक्कदायक प्रकार दहिसरमधून समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

BMC Election 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. महानगरपालिका निवडणुकीत उमदेवारांवर दबाव, पैशाचा वापर, दमदाटी केल्याचे गंभीर  प्रकार घडत आहेत. अशातच आता प्रचाराला विरोध केल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोघांना बेदम मारहाण केल्याचा धक्कदायक प्रकार दहिसरमधून समोर आला आहे.

प्रचाराला विरोध केल्याने मारहाण...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरात प्रचार करण्यास विरोध केल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोन व्यक्तींना बेदम मारहाण केल्याची घटना दहिसरमध्ये घडली आहे. दहिसर प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रेखा राम यादव यांच्या प्रचारादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी  लाथा-बुक्क्यांसह पक्षाच्या झेंड्यांनीही मारहाण केल्याच्या व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. 

रवींद्र चव्हाणांना घरचा आहेर; विलासराव देशमुखांबद्दलच्या विधानावर भाजप कार्यकर्त्यांचा संताप

सोमवारी दहिसरच्या विठ्ठलवाडी सोसायटीजवळ रेखा राम यादव यांचा प्रचार शिंदे गटाकडून सुरु होता. हा प्रचार सुरू असताना काही कार्यकर्ते एका घरात प्रचार करण्यासाठी गेले, मात्र त्या घरातून प्रचारासाठी विरोध करण्यात आला, यावेळी शिंदे गटाचे प्रचार करणारे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्या घरातील दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. 

व्हिडिओ व्हायरल...

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी एम.एच.बी पोलिसांनी रात्री शिवसेना शिंदे गटाचे आठ ते दहा कार्यकर्त्यांविरोधक गुन्हा दाखल करून धरपकड सुरू केली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या प्रचारामध्ये कार्यकर्त्यांच्या गुंडागिरीमुळे परिसरात मोठा राजकीय तणावाचा वातावरण निर्माण झाला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

दरम्यान,  या मारहाणीच्या घटनेवर प्रभागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. निवडून येण्यापूर्वी जर कार्यकर्त्यांची अशी दादागिरी असेल तर  भविष्यात काय होणार? अशा प्रश्न दहिसरमध्ये स्थानिक नागरिक विचारत आहेत. या मारहाण प्रकारामुळे आता विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे.