Mumbai News: मुंबईकरांसाठी Good News! दक्षिण मुंबईतील ट्रॅफिकमधून कायमची सुटका; 'हा' उड्डाण पूल सुरु होणार

येत्या १५ जुलैपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी सायन पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

जाहिरात
Read Time: 2 mins

BMC Sion Bridge Reconstruction Update: मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सायन रेल्वे उड्डाणपुलाचे काम १५ दिवसांनी लांबणीवर पडले असले तरी, येत्या १५ जुलैपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी सायन पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

Nashik News: नाशिककरांनी लक्ष द्या! शहरातील अत्यंत महत्त्वाचा चौक 3 महिने बंद; वाहतुकीचा मोठा खोळंबा

दक्षिण मुंबईतील वाहतुक कोंडी सुटणार!

रेल्वे रुळांवर पोलादी तुळया (Steel Beams) बसविण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्याने कामाला विलंब झाला असला, तरी इतर कामांचा वेग वाढवून हा विलंब भरून काढण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. ​मुंबईतील मान्सूनपूर्व कामांची आणि विविध प्रकल्पांची पाहणी करताना आयुक्तांनी स्पष्ट केले की, पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ३० एप्रिलनंतर शहरातील कोणत्याही नवीन रस्ते खोदकामांना परवानगी दिली जाणार नाही.

Advertisement

सायन पुलाच्या कामात सुरुवातीला ३० एप्रिलपर्यंत गर्डर बसवण्याचे नियोजन होते, मात्र आता ही मुदत १५ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व तुळया ३१ मेपर्यंत बसवून पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, १५ जुलैपर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

​सुमारे ६० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा ६१ मीटर लांबीचा पूल पूर्व द्रुतगती महामार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल. १९१२ मध्ये बांधलेला जुना पूल धोकादायक ठरल्याने तो पाडून आता चार पदरी नवीन पूल उभारला जात आहे, ज्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.

Maharashtra Politics: 'काँग्रेसचा जप आणि खोटारडेपणाचा गजर', हर्षवर्धन सपकाळांचा PM मोदींच्या भाषणावरुन पलटवार