मुंबई: उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारचा कार्यक्रम सह्याद्री अतिथी गृहावर पार पडला. चा चहापानानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचे विधान केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सरकारने याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात क्लोअज फॉर ऑर्डर आहे, त्यामुळे त्यांसंदर्भात आम्हाला कोणतीही भूमिका मांडता येत नाही. याप्रकरणी जो काही न्यायालय निर्णय देईल, तो आम्हाला बंधनकारक असेल," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तसेच "आपल्याला कल्पना असेल की त्यांची शिक्षा स्थगित झाली आहे. आता जी काही शिक्षा असते त्याला जर न्यायालयाने स्थगिती दिली तर त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्याची आवश्यकता नाही. जर न्यायालयाने यावर स्थगिती दिली नाही तर त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सध्या ते प्रकरण न्यायालयात आहे,न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित निर्णय घेतला जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
"अनेकवेळा अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे मुद्दे उपस्थित होतात. त्यावर आम्ही भरपूर चर्चा केली. कुठेही नैतिकतेचे अधिपतन झाल्याचे आढळल्यास त्यावर कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू..." असे सूचक संकेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.