Buldhana Crime News: संयमाचा बांध फुटला! मुलाने दांडक्याने मारहाण करत वडिलांना संपवलं

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल गावंडे, बुलडाणा

Buldhana Crime News :  दारुड्या पित्याची मुलाने निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यातील लोणी गुरव या गावात हा प्रकार उघडकीस आला आहे. गोरख हिवराळे (55 वर्ष) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर धनंजय हिवराळे असं 25 वर्षीय आरोपी मुलाचं नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसाह लोणी गुरव गावात दाखल  झाले. आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख हिवराळे हे घरात अंथरुणावर मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती लोणी गुरव येथील पोलीस पाटील व अन्य नागरिकांनी खामगाव ग्रामीण पोलिसांना दिली. प्राथमिक चौकशीत गोरख हिवराळे याचा मुलगा धनंजय गोरख हिवराळे यानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

(नक्की वाचा- CCTV Footage : सुपरमॅन उडी, गाडीवर बसला अन् पळाला; आरोपी क्रिश पोलिसांच्या तावडीतून फरार)

मृत गोरख हिवराळे याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन गोरख आपल्या पत्नीला दररोज मारहाण करत असे. आपल्या जन्मदात्या आईला दारुडा बाप रोज मारतो, याची आरोपी धनंजयला चीड होती. यामुळे त्याने  बापाला कायमचे संपवायचे मनोमन ठरवले. मंगळवारी 29 एप्रिल रोजी रात्री उशीरा धनंजय याने जाड लाकडी दांड्याने दारूच्या नशेत असलेल्या बापाला मारहाण केली. यात गोरखचा मृत्यू झाला. 

Advertisement

(नक्की वाचा- Pahalgam Terror Attack: 'ती' दुर्घटना घडली अन् पहलगाम हल्ल्यातून 18 जण वाचले, नाशिककरांनी सांगितला थरारक अनुभव!)

दरम्यान गोरख हिवराळे हा मूळचा बोथा काझी तालुका खामगावचा रहिवासी होता. काही वर्षांपूर्वी तो आपलं सासर असलेल्या लोणी गुरव येथे राहायला आला होता. या निर्घृण हत्येने संपूर्ण लोणी गुरव गाव हादरले आहे. पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस पोलीस करत आहेत.

Topics mentioned in this article