अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर:
Chandrapur Farmer Shocking Story: कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली, असा आरोप शेतकऱ्याने केला होता.त्याचा आरोपाने महाराष्ट्र हादरून गेला.या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपीना ताब्यात घेतले आहे.आरोपीना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.शेतकऱ्याने खरंच किडनी विकली काय ? हा खरा प्रश्न होता. पोलिसांनी बुधवारचा रात्री चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची सोनोग्राफी करण्यात आली.यात डाव्या बाजूची किडनी काढल्याचे पुढे आले आहे .सावकारी जाचातून पुढे आलेले हे प्रकरण आता मानवी अवयवांचा तस्करीचा दिशेकडे सरकले आहे. पोलीस विभागाने चौकशीसाठी सहा पथके तयार केलीत.चौकशीत धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कर्जासाठी किडनी विकली!
खरंतर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा, बळीराजा म्हटलं जात. जगाचं पोट भरणाऱ्या या राज्यावर आत्महत्या करण्याचा प्रसंग का ओढाविता हा चिंतनाचा विषय. शेतकऱ्यांचा हितासाठी अशी ओरड करीत सत्तेवर आलेले सरकार योजनाचे फुगे सोडतो खरे, मात्र शेतकऱ्यांचा घर गाठायचा आधीच हे फुगे कुठे फुटतात हा ही शोधाचा विषय आहे. एकीकडे कर्जाचं ओझं वाहू न शकणारे शेतकरी गळ्यात फास टाकीत आहेत.
तर दुसरीकडे कर्ज फेडाण्यासाठी एका शेतकऱ्याला किडनी विकावी लागली. चंद्रपूरातुन पुढे आलेलं बळीराजाचे हे भयाण वास्तव सरकारचा डोळ्यात अंजन घालणारे ठरले आहे. चंद्रपूर जिल्हातील मिनथुर गावातील शेतकरी रोशन कुडे यांच्यावर हा दुदैवी प्रसंग ओढवीला आहे. एक लाख रुपये त्याने सावकाराकडून व्याजाने घेतले. एक लाखाचे 74 लाख झाले.
Pune News : 'आम्ही इथले भाई आहोत' फुशारकी मारणाऱ्या तरुणांची गुंडगिरी पोलिसांनी अशी उतरवली
दागिने, ट्रकटर, दुचाकी आणि जागासुद्धा त्याने विकली. शेवटी किडनी विकून त्याने आठ लाख रुपये सावकारांना दिले. हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली.पोलीस विभागाने आरोपी सहा सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील एकजण फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शेतकऱ्याची विदेशवारी..
कर्ज फेडण्यासाठी रोशन कुडे हा कंबोडिया देश्यात गेला होता. त्याला कलकत्ता येथील कृष्णा नामक डॉक्टराने मदत केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. डॉ. कृष्णा यांने पाठवलेल्या तिकिटाने कुडे कोलकाता येथे पोहोचले. तिथे वैद्यकीय प्रयोगशाळेत नेऊन रक्ताचे नमुने घेतल्या गेले.यानंतर त्याचा पासपोर्ट काढण्यात आला. या पासपोर्टवर वीस दिवसांचा कंबोडियाचा शिक्का असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. कंबोडिया येथील नॉम पेन्ह या शहरात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी कुडे याच्यावर किडनी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
नक्की वाचा - Pune News : राज्यात पहिल्यांदा दिली अशी शिक्षा; पुण्यात उपद्रवी तरुणांची सुटका नाहीच!
सावकारी फास ते मानवी अवयवांची तस्करीकडे वढलेलं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. कुडे यांनी जून २०२५ मध्ये रोशन कुडे लाओस या देशाची राजधानी व्हियानतियान येथे गेल्याची माहिती पुढे आली आहे. तिथल्या एका कॉल सेंटरमध्ये त्यांने सतरा दिवस नोकरी केली. त्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.खेड्या गावातील एक सामान्य, कर्जबाजारी शेतकरी विदेशात किडनी विकतो, नौकरी करतोय, हा प्रकार चक्रवून टाकणारा आहे. पोलिसांचा तपासात अधिक धक्कादायक तथ्य पुढे येण्याची शक्यता आहे.