CM Devendra Fadnavis: 'चंद्रपूरवर भाजप- शिवसेनेचा भगवा फडकणार', CM देवेंद्र फडणवीसांना विश्वास

चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो झाला. या रोड शोनंतर झालेल्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरमध्ये- भाजप शिवसेनाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला..

जाहिरात
Read Time: 2 mins

CM Devendra Fadnavis Sabha Chandrapur: राज्याच्या राजकारणात सध्या 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज चंद्रपूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो झाला. या रोड शोनंतर झालेल्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरमध्ये- भाजप शिवसेनाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला..

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

"आज ज्या प्रकराचा रोड शो आपल्या सर्वांच्या उपस्थित मी पाहिला. तो पाहून आता मी दाव्याने सांगतो चंद्रपूरवर  भाजप शिवसेनाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मागच्या काळात आमचे सुधीरभाऊ हे पालकमंत्री असताना, हंसराज भैया खासदार असताना चंद्रपूर शहराचा चेहरा बदलवण्याचे काम केले. या चंद्रपूरमध्ये जर काही दिसत असेल तर त्याचे श्रेय भाजप- शिवसेना महायुतीचे आहे. भाजप शिवसेनेशिवाय इथे कोणी काम केले नाही. चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम भाजप शिवसेनेने केले आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

BMC Election 2026: उद्धव ठाकरेंना बंडखोरामुळे मिळाला आधार, नील सोमय्यांच्या बिनविरोध विजयाचे स्वप्न भंगले

चंद्रपूरवर भाजप-शिवसेनेचा भगवा फडकणार..

"पिण्याच्या पाण्याची योजना, गटाराची योजना, पथदिव्याची योजना, घरे देण्याची योजना असेल.. चंद्रपूरचा चेहरा बदलण्याचे काम याठिकाणी झाले. म्हणूनच पुन्हा एकदा आलोय.. आपल्या देशाचे नेते मोदींनी  शहरांसाठी ५० कोटींचा निधी दिला आहे. पण चंद्रपूरसाठी आम्ही पैसा आणला आणि इथे महापालिकेत कोणी दलाल बसले, भ्रष्ट बसले, अनाचारी, दुराचारी बसले तर चंद्रपूरचा विकास होणार नाही," असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

दरम्यान,  चंद्रपूरचा कायापालट करण्याकरिता, चेहरा मोहरा बदलण्याकरिता एकदा भाजप- शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब करावे, चंद्रपूरकरांनो १५ तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, १६ तारखेपासून पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

नक्की वाचा: भाजप उमेदवारांकडून ओवाळणीतून मतदारांना पैसे वाटप? काँग्रेसच्या आरोपाने खळबळ