Shocking: एक्स रे काढायला गेलेल्या महिलेसोबत भयंकर प्रकार! कपडे काढायला सांगितले अन्.. डॉक्टरविरोधात गुन्हा

एक महिला एक्स-रे काढण्यासाठी तुकूम येथील सचिन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेली होती. एक्स-रे रूममध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्याने तिला वरचे कपडे काढण्यास सांगितले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर:

Chandrapur News: डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्सरे काढायला गेलेल्या महिलेला चेंजिंग रुममध्ये सीसीटीव्ही आढळल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे. याप्रकरणी महिलेने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डॉक्टरला सूचना पत्र देऊन सोडून दिले. मात्र महिलांच्या चेंजिग रुममध्ये अशाप्रकारे सीसीटीव्ही आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. 

एक्स रे रुममध्ये सीसीटीव्ही..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूरमध्ये एका  डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एक्स-रे काढायला गेलेल्या महिलेला चेंजिग रुममध्ये सीसीटीव्ही असल्याचा संशय निर्माण झाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिला प्रकृती ठीक नसल्याने एक महिला एक्स-रे काढण्यासाठी तुकूम येथील सचिन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेली होती. एक्स-रे रूममध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्याने तिला वरचे कपडे काढण्यास सांगितले. 

Advertisement

Ambernath News: 'आई-बाबा मला माफ करा...', पोलीस भरतीतील अपयशाने अंबरनाथमध्ये तरुणीचा टोकाचा निर्णय

त्यावर संबंधित महिलेने कपडे का काढायचे? असा प्रश्न उपस्थित केला. आतील कपड्यांमध्ये मेटल असू शकते, त्यामुळे एक्स-रेसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो, असे कर्मचाऱ्याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर संबंधित महिलेचा एक्स-रे काढण्यात आला. दरम्यान, एक्स-रे रूमच्या वरच्या कोपऱ्यात लाल रंगाचा छोटा दिवा दिसल्याने तिने त्याबाबत विचारणा केली.

डॉक्टरविरोधात तक्रार!

त्यावर चोरी टाळण्यासाठी सीसीटीव्ही असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. संशय आल्याने संबंधित महिला डॉक्टरांच्या कक्षात गेली असता मॉनिटरवर लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज सुरू असल्याचे तिला दिसल्याचा आरोप आहे.

 दरम्यान, मागील काही मिनिटांचे फुटेज दाखवण्याची मागणी केली असता तांत्रिक कारणामुळे रेकॉर्डिंग उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित डॉ.सचिन विश्वंभर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मात्र सूचना पत्र देवून आरोपी डॉ. ला सोडून देण्यात आले. 

( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )

Topics mentioned in this article