नाराज छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? दोन ओळीत स्पष्ट संकेत; म्हणाले...

छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागपूर: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य उफाळून आले आहे. अजित पवार यांच्या मंत्रिमंडळात दिग्गजांना डच्चू देण्यात आला असून ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले आहे. यावरुनच आता छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणालेत छगन भुजबळ?

नव्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज आहेत. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. आज नागपूरमध्ये बोलतानाही त्यांनी आपण नाराज असल्याचे सांगितले. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलंल काय, फेकलं काय काय फरक पडतो? मला मंत्रिपदे किती आली किती गेली. छगन भुजबळ संपला नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तसेच मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्याचे बक्षीस मला मिळाले अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी मांडली. तसेच दुःखी मेरे मन जहा नही चैना वहा नही रहना' असे म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांची साथ सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भुजबळांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप होणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, छगन भुजबळ यांनी राज्यसभाही नाकारल्याचे समोर आले आहे. जेव्हा राज्यसभा मागितली तेव्हा मला विधानसभेत लढावं लागेल असं म्हणत डावलण्यात आले. आता मी राज्यसभा घेतली तर मतदारांशी प्रतारणा होईल, असं छगन भुजबळ म्हणालेत. नव्यांना संधी दिली जात आहे, त्यासाठी ज्येष्ठांना डावलले जात असल्याचेही ते म्हणाले. 

Advertisement

(नक्की वाचा- "ठाकरे ब्रँड आणि तुम्ही अजुनही शेंबडे", निलेश राणेंच्या ट्वीटला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर)