Accident News: मद्यधुंद तरुणाचा 'कार'नामा! 6 जणांना उडवले; 3 वाहनांनाही धडक, दोघे जखमी

Chhatrapati Sambhajinagar Drunk And Drive: कार मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने धावत होती. चालकाने कार्तिकी सिग्नल परिसरात एका कारला धडक दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

  छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील पदमपुरा ते समर्थनगर भागात रात्री उशिरा एका मद्यधुंद कारचालकाने ६ जणांना उडवले. त्यासोबत भरधाव कार चालकाने तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला आणि मुलगी गंभीर जखमी झाली. नागरिकांनी चालकाला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. संकेत शंकर अंभोरे असे कार चालकाचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संकेत अंभोरे हा रात्री कारने क्रांती चौकाकडून पदमपुऱ्याच्या दिशेने येताना अहिल्यादेवी होळकर चौकातून पंचवटी रोडवर पायी जाणाऱ्या अनसाबाई भागीरथ बरंडवाल आणि एका मुलीला उडवले. यावेळी काही तरुणांनी कारचा पाठलाग केला. कार मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने धावत होती. चालकाने कार्तिकी सिग्नल परिसरात एका कारला धडक दिली.

Dog Bites : छत्रपती संभाजीनगरमध्ये दहशत, पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच वेळी 14 जणांचे तोडले लचके 

त्यानंतर चालकाने कार सावरकर चौकाच्या दिशेने पळवली. त्यानंतर बंडू वैद्य चौकात दुचाकीला धडक दिली. पुन्हा समर्थनगर परिसरात स्कॉर्पिओला धडक दिली. येथे कार थांबल्यानंतर पाठलाग करणाऱ्या तरुणांनी संकेतला गाठले. त्यावेळी संकेतने मद्य प्राशन केल्याचे लक्षात आले. नागरिकांनी संकेतला चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळाहून संकेतला ताब्यात घेतले. त्यानंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणले. प्रकाश कटारे यांच्या तक्रारीवरून रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

दुसरीकडे, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिर येथून दर्शन घेऊन परतत असतांना पिनाकेश्वर घाटात भाविकांची ट्रॅक्टर-ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याने 2 जण ठार तर 13 भाविक जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक व  पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करत भाविकांना बाहेर काढले...जखमींना बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविले..अपघातातील मयत व जखमी हे संभाजीनगर जिल्ह्यातील जाणेफळ व खामगाव येथील रहिवासी होते.

नक्की वाचा - UP Crime: लेकीच्या बर्थडे पार्टीत वडिलांची निर्घृण हत्या, गाण्याचा आवाज वाढवल्याने शेजाऱ्याने संपवलं