मोसीन शेख, छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही वर्षांपासून राज्यात वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळत आहे. एकीकडे वाळू तस्करीविरोधात राज्य सरकार कडक कायदे करत असताना वाळू माफियांची दादागिरी मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांनाच पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांनाच चक्क पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. पोलिसांनी वाळूमाफियांविरोधात भूमिका घेण्याऐवजी शंभर ते दीडशे वाळूमाफियांना पोलिस स्टेशनमध्ये आणले.
पुढे पोलिसांनी तहसीलदार यांची तक्रार लिहून न घेता तीन तास बसवून ठेवले आणि तहसीलदार यांची शासकीय गाडी जप्त केल्याचा आरोप तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी वाळू माफियांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच हल्ला करण्याचाही प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे, ज्याचे व्हिडिओही त्यांनी शेअर केले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कुणाला वगळले? यादी आली समोर
दरम्यान, वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गलेल्या तहसीलदारांची गाडी जप्त करण्याचा पहिलाच प्रकार महाराष्ट्रात घडल्याचा दावा देखील मुंडलोड यांनी केला आहे. त्यामुळे प्रश्न असा पडतोय की पोलिसांनी वाळूमाफियांवर कारवाई करण्याऐवजी तहसीलदारांवर कारवाई कशी केली? असा सवाल आता उपस्थित होत आहे.