Rajyabhishek AI VIDEO: रयतेचे राजे छत्रपती झाले! AIने केला शिवराज्याभिषेकाचा VIDEO; पाहा 1674चा सुवर्ण क्षण

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyashishek Sohala AI VIDEO: AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हा डोळ्याचं पारण फेडणारा अलौकिक सोहळा पून्हा एकदा जिवंत केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Shivrajyabhishek Sohala AI Video:  अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, आपल्या अतुलनीय पराक्रमाने मुघलांची जुलमी सत्ता उलथून टाकणारे रयतेचे राजे म्हणजे शिवाजीराजे महाराज भोसले. शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक आणि तेजस्वी क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवरायांचा 352 वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा होत असतानाच AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हा डोळ्याचं पारण फेडणारा अलौकिक सोहळा पून्हा एकदा जिवंत केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अलिकडच्या काळात तंत्रज्ञान विश्वात एआयने मोठी क्रांती केली आहे. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धीमतेने अनेक नवनवे फोटो, व्हिडिओ तयार केले जातात. अनेक प्रकारच्या ऐतिहासिक घटना, इतिहासातील क्षणांचीही या एआयमुळे पुन्हा निर्मिती केली जाते, काल्पनिक दृश्ये नव्याने पुन्हा जिवंत केली जातात सध्या सोशल मीडियावर एआयने तयार केलेला असाच एक सुंदर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ आहे 350 वर्षापूर्वी झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा. 350 वर्षापूर्वी झालेल्या या ऐतिहासिक क्षणांची, पवित्र सोहळ्याची AI ने केलेली ही काल्पनिक प्रतिकृती पाहून शिवप्रेमीही भारावून गेलेत.  शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सज्ज झालेली रयत, मंत्रांचा जप, फुलांच्या भव्यदिव्य सजावटीने बहरुन निघालेला रायगड, अंगावर काटा आणणारी गारद अन् सिंहासनावर विराजमान झालेले रयतेचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज. हा व्हिडिओ पाहताना 350 वर्षांपूर्वी राज्याभिषेक सोहळा कसा झाला असेल? याचीच प्रचिती येते. 

गब्बरसिंग या अकाऊंटवरुन ट्वीट करण्यात आलेला हा सुंदर व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्यावर शिवप्रेंमींनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. सुशांत चव्हाण या तरुणाने हा व्हिडिओ AIच्या मदतीने तयार केला आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देताना प्रत्यक्षात हा सोहळा अनुभवतोय असा भास झाल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने सोशल मीडियावरील हा सर्वात सुंदर व्हिडिओ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Advertisement

Beed Crime: आणखी एक वैष्णवी! पैशासाठी सुनेचा छळ, बीडमध्ये विवाहितेने आयुष्य संपवलं