Bhshan Gavai News: सरन्यायाधीश संतापले, जाहीरपणे नाराजी अन् 3 अधिकाऱ्यांची तात्काळ दिलगिरी, नेमकं काय घडलं?

मुंबई आणि गोवा बार असोसिएशनच्या वतीने देशाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभ आयोजन करण्यात आला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: भारताचे 52 वे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राच्या अमरावतीचे सूपूत्र भूषण गवई यांचा आज मुंबईमध्ये बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडून सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला भूषण गवई यांच्यासह त्यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या. यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपला संघर्ष मांडत असतानाच अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरुन जाहीर नाराजीही व्यक्त केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नेमकं काय घडलं?

मुंबई आणि गोवा बार असोसिएशनच्या वतीने देशाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभ आयोजन करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. लोकांचा प्रतिसाद पाहून भाषणादरम्यान अमरावतीचे सुपूत्र भूषण गवई भावुक झाले. त्याचबरोबर त्यांनी काही अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सत्काराला महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी दांडी मारली. ज्यावरुनच भूषण गवई यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही या राज्याचा. तुम्ही दिलेली वागणूक योग्य आहे का याचा तुम्ही विचार करावा. दुसरा कोणी असता तर कायदा सांगितला असतामला प्रोटोकॉल द्यावा याची गरज नाही. मात्र विषय पदाचा आणि सन्मानाचा आहे, असे भूषण गवई म्हणाले.

नक्की वाचा - Shirdi News : भारत-पाकिस्तान युद्धाच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक, साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार

दरम्यान,  या सत्कार समारंभानंतर भूषण गवई यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याठिकाणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी हजेरी लावली. तसेच पहिल्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. 

Advertisement