बीड सरपंच हत्या प्रकरण! CM फडणवीसांचा मोठा निर्णय; न्यायालयीन चौकशी होणार

गुन्हेगार कोणीही असो त्याची हयगय न करता बीडमधील संघटित गुन्हेगारी मोडून काढू अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते बोलत होते. 

जाहिरात
Read Time: 3 mins

सागर कुलकर्णी, नागपूर: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण अत्यंत निर्घृण असून याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. गुन्हेगार कोणीही असो त्याची हयगय न करता बीडमधील संघटित गुन्हेगारी मोडून काढू अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते बोलत होते. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगमध्येही एक प्रकरण झाले. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. केवळ संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली एवढेच
मर्यादीत नाही तर बीडमध्ये ज्याप्रकारे गुंडगिरी पाहायला मिळतेय ती संपवावी लागेल. याची पार्श्वभूमी म्हणजे.. आव्हाडा ग्रीन एनर्जीने तिथे एक मोठी गुंतवणूक केली आहे. यामधून मोठी कामे निघत आहेत, रोजगार मिळत आहेत. म्हणून काही लोक ही कामे आम्हालाच द्या नाहीतर खंडणी द्या अशा मानसिकतेत वावरत आहेत.

यामधीलच एक प्रकार म्हणजे, मस्साजोग मधील कंपनीच्या ऑफिसमध्ये अमरदीप सोनवणे या वॉचमनला मारहाण केली तसेच प्रॉजेक्ट मॅनेजरलाही मारहाण केली. यावेळी संतोषदेशमुख यांना कळवल्यानंतर ते त्या ठिकाणी आले. तिथे थोडी मारहाण झाली. देशमुख यांच्यासोबत अनेक लोक आले होते त्यांनी साहजिकच बाहेरुन येऊन दादागिरी करणाऱ्यांना धडा  शिकवण्यासाठी थोडा चोप दिला, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यानंतर 9 तारखेला, संतोष देशमुख हे चारचाकीमधून गावी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचे आतेभाऊ होते, जे गाडी चालवत होते.  यावेळी टोलनाक्याजवळ काळी स्कॉर्पिओ आणि एक दुसरी गाडी त्यांची वाट पाहत होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यांना अडवून पहिल्यांदा ड्रायव्हर साईडची काच फोडली. त्यानंतर दुसरी काच फोडून सरपंचांना बाहेर काढून स्कॉर्पिओमध्ये टाकलं. बराचवेळ त्यांना
गाडीतच मारहाण केली. त्यांनी तारांनी प्रचंड मारहाण केली. पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली. यावेळी असं लक्षात आलं की ते जिवंत नाहीत
तेव्हा त्यांना सोडून ते पळाले.  प्रचंड मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांचे डोळे जाळण्यात आले ही वस्तुस्थिती नाही. त्यांच्या डोळ्यांवर मारण्यात आली. मात्र या घटनेवर ऍट्रॉसिटी उशिरा का नोंद झाली? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र त्यांनी स्वतःच्या मारहाणीची तक्रार दिल्याने ती नोंद व्हायला वेळ झाला.

Advertisement

(नक्की वाचा-  BJP vs Congress : संसद परिसरातील अभूतपूर्व गदारोळानंतर लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय)

दोषींवर कारवाई होणार...

मात्र याचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी कारवाई होईल. वाल्मिक कराडचे नाव घेऊन सांगतो तो कोणाचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे कोणासोबत फोटो आहेत, याचा विचार न करता कारवाई होईल. कारण बीडमध्ये जी अराजकता आहे ती चुकीची आहे. यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत, त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल. या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पण्ण झाल्यास त्यांनाही संघटित गुन्ह्यामध्ये टाकले जाईल. बीड जिल्ह्यामध्ये एक मोहिम हातात घेऊन सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई होईल.

आयजी लेव्हल अधिकारी अंतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही केली जाईल. तीन ते सहा महिन्यात याप्रकरणाची चौकशी होईल.  तसेच बीडच्या एसपींची बदली करण्याचा निर्णय मी घेतला आहे, अशी सर्वात मोठी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- हत्येचा प्रयत्न, धमकी आणि...; राहुल गांधींविरोधात FIR दाखल, ती 6 कलमं कोणती?)