Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यावर काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान, CM फडणवीस संतापले, सडकून टीका केली!

पण विषमता निर्माण करून किंवा दोन धर्मात दंगली निर्माण होईल अशा प्रकारचा नव्या अभ्यासक्रमात समावेश करणे आणि तो इतिहास संपवतात अशी टीकाही त्यांनी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यामध्ये 26 भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला ज्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाने नवा वाद उभा राहिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांना धर्म विचारत बसतात का? दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे आहे की कोणाच्या कानात जाऊन तुमचा धर्म कोणता आहे? असे विचारतील. काही जण धर्माबाबत विचारणा करत गोळीबार केल्याचा दावा नाकारत आहेत. दहशतवाद्यांना कोणताही जाती धर्म नसतो या हल्ल्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी इतर कोणताही रंग देऊ नये.. असे विजय वडेट्टीवार म्हणालेत.

एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास हटवला यावरही विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे विधान केले. इतिहास पुसून नवा इतिहास लिहिण्याची काहीतरी ताकद तरी दाखवा. इतिहास हा झालेल्या घटनांची साक्ष असते. इतिहासात जे घडलं तो ठेवा आपण जपत असतो पण विषमता निर्माण करून किंवा दोन धर्मात दंगली निर्माण होईल अशा प्रकारचा नव्या अभ्यासक्रमात समावेश करणे आणि तो इतिहास संपवतात अशी टीकाही त्यांनी केली.

नक्की वाचा - Mumbai News: परफेक्ट नियोजन अन् करेक्ट कार्यक्रम... मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुसाट!

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या विधानावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारची वक्तव्ये करुन या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या जखमेंवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. तिथे कुठे होते विजय वडेट्टीवार.. अशा प्रकारच्या मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावा समजत नाही.. अशी टीका त्यांनी केला. 

Advertisement