Cyclone Shakti Alert Maharashtra: एकीकडे पावसाने विश्रांती घेतली असतानाच राज्यावर नवे संकट ओढावले आहे. महाराष्ट्रावर सध्या 'शक्ती' चक्रीवादळाचे (Cyclone 'Shakti') मोठे संकट घोंगावत आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाने (Disaster Management Department) या वादळाच्या संभाव्य परिणामांबाबत जिल्हा स्तरावर अतिदक्षतेचा इशारा (District Impact Warning) जारी केला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना धोका? Affected Coastal District
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्री वादळाचा फटका बसणार आहे. हे चक्रीवादळ ३ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रभावी असण्याची शक्यता आहे, ज्याची तीव्रता सध्या कमी ते मध्यम (Low to Moderate) स्तरावर आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर (Coastal Districts) याचा परिणाम होणार आहे.
चक्रीवादळाचा धोका आणि तयारी: Warning And Prepareness
हे चक्रीवादळ ३ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रभावी असण्याची शक्यता आहे, ज्याची तीव्रता सध्या कमी ते मध्यम (Low to Moderate) स्तरावर आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर (Coastal Districts) याचा परिणाम होणार आहे. ३ ते ५ ऑक्टोबर या दरम्यान ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि ताशी ६५ किमी पर्यंत सोसाट्याचे वारे (Squally winds) येण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ५ ऑक्टोबरपर्यंत समुद्र खवळलेला ते अत्यंत खवळलेला (Rough to very rough sea conditions) राहील.
दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रामध्ये जाऊ नये, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे. तसेच र्व विदर्भ, मराठवाड्याचे काही भाग आणि उत्तर कोकण यांसह राज्याच्या अंतर्गत (Interior) भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसाची शक्यता आहे. यामुळे सखल भागात संभाव्य पुराचा धोका (Potential flooding) आहे.