Yugendra Pawar Engagement: शरद पवारांच्या घरी लगीनघाई! युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न; पाहा फोटो

Yugendra Pawar Tanishka Engagement: अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. खासदार सुळे यांच्या व्हॉट्स अप स्टेट्स मधून ही माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Yugendra Pawar Engagement: राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार., उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबामध्ये आणखी एक लग्नाचा बार उडणार आहे. काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला. त्यानंतर पवार फॅमिलीमध्ये आणखी एका लग्नाची तयारी सुरु झाली आहे. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. खासदार सुळे यांच्या व्हॉट्स अप स्टेट्स मधून ही माहिती समोर आली आहे. तनिष्का असं युगेंद्र पवारांच्या होणाऱ्या पत्नीचे नावं आहे. (Yugendra Pawar Engagement With Tanishka)

युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे, बंधु श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकताच युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला असून त्याचे फोटोही समोर आलेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्स अप स्टेट्समधून ही माहिती समोर आली आहे. तनिष्का असं युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे. ही तनिष्का नेमकी कोण? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. 

Advertisement

शरद पवारांचा सल्ला ऐकला!

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता. एकट्याने किती दिवस अभिनंदन करायचं, आता अक्षता टाकायची संधी द्या. लग्न करा, लांबवू नका.. असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर आता युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला असून लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत. 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची साथ देत राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला होता. बारामती लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत त्यांनी काका अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यांना विधानसभेची उमेदवारीही मिळाली होती. या निवडणुकीत काका अजित पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 

MNS Morcha : राज ठाकरेंच्या आवाहनाला शरद पवारांकडून टाळी, 5 तारखेच्या मोर्च्याबाबत मोठी घोषणा