Devendra Fadnavis Exclusive : एकनाथ शिंदे सतत दिल्लीला का जातात? CM नी सांगितलं कारण, 2029 बाबत मोठी घोषणा

Devendra Fadnavis Exclusive : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Devendra Fadnavis Exclusive : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'NDTV मराठी' ला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर:

Devendra Fadnavis Exclusive : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे.फडणवीस सरकारची वर्षपुर्ती होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिंदे यांनी याबबत दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असंही वृत्त आलं होतं. तसंच पालघरमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कथित दुराव्याचीही चर्चा होती. या सर्व विषयावर मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NDTV मराठीला Exclusive प्रतिक्रिया दिली आहे. 'NDTV मराठी'मंचच्या 'अनस्टॉपेबल महाराष्ट्र' या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

पालघरमध्ये काय घडलं?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एकनाथ शिंदे नाराज आहेत या कपोकल्पित गोष्टींवर आम्ही वेळ घालवला तर आम्हाला कामाला कधी वेळ मिळेल? पालघरमधील एका कार्यक्रमात आम्ही आमच्या भाषणाचे मुद्दे काढत बसलो होतो, तेव्हा दोघे एकमेकांशी बोलत नाहीत, अशा क्लिप माध्यमांनी चालवल्या. त्यानंतर मी शिंदे साहेबांना सांगितलं की कुठंही गेलं तरी कॅमेऱ्याकडं बघून आपण एक पोझ द्यायची आणि त्यानंतर कार्यक्रम सुरु करायचा आहे."

शिंदे दिल्लीला का जातात?

 शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "शिंदे साहेब दिल्लीत का जातात? तर त्यांचा मुलगा दिल्लीत आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांकडे आमचे 10 कामे असतात. अजितदादाही दिल्लीत जातात, पण तुम्हाला ते दिसत नाहीत." एकनाथ शिंदे दिल्लीत माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटतात तोपर्यंत काळजीचं कारण नाही. ते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटणार नाहीत, इतकीच मी काळजी घेईन, असंही त्यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : Tukaram Mundhe :IAS तुकाराम मुंढे यांच्यावर थेट निलंबनाची तलवार; भाजपा आमदारांचा 'धमकी'चा आरोप, विधानसभेत खळबळ )
 

महायुतीमधील नाराजी आणि पक्षातील फोडाफोडीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, "एकदा खाली काही प्रॉब्लेम झाले होते. त्यांनी आम्ही त्यांचे लोक घेतले, नाराजी झाली, पण आम्ही एकत्र बसलो आणि ही नाराजी सोडवली. त्यामधून सरकारला धोका आहे, शिंदे साहेब कुठे चाललेत, असं काही नाही. शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) कोणताही विद्यमान तसेच माजी आमदार, खासदार आमच्याकडं येणार नाही आणि आमचाही त्यांच्याकडं जाणार नाही.आमच्या मित्रपक्षांसोबत आम्ही 2029 ची निवडणूक लढवणार आहोत, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.  

गेल्या काही दिवसामध्ये भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडले. त्यामुळे काही नाराजी झाली होती. त्यावेळी आम्ही एकत्र बसलो. मी त्यांच्या (एकनाथ शिंदे) हे लक्षात आणून दिलं की, "हे तुम्ही पहिल्यांदा सुरु केले. तुम्ही उल्हासनगरमध्ये आमच्या लोकांना घेतले. त्यानंतर आम्ही तुमच्या काही जणांना कल्याण-डोंबिवलीत पक्ष प्रवेश दिला." आता हे प्रकार भविष्यात होणार नाहीत, हे आम्ही निश्चित केलं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Advertisement
Topics mentioned in this article