Karuna Sharma Munde News: संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड कनेक्शनमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच धनंजय मुंडे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. करुणा शर्मा- मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नीच आहेत, सर्वात मोठा निर्वाळा कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचार केल्याचा हवाला देत करुणा मुंडे यांना दैनंदिन खर्चासाठी महिन्याला 2 लाख रुपये द्या असा आदेश कोर्टाने दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने सर्वात मोठा धक्का दिला आहे. करुण शर्मा- मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर लावलेले घरगुती हिंसाचाराचे आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. या प्रकरणात धनंजय मुंडेंना कोर्टाने दोषी ठरवले असून करुणा- शर्मा मुंडे यांना दैनंदिन खर्चासाठी दर महिन्याला दोन लाख रुपये द्या.. असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यांना मारहाण झाली असून यापुढे त्यांच्या देखभालीसाठी करुणा शर्मांना दर महिन्याला 1लाख 25 हजार रुपये आणि मुलगी शिवानी मुंडेला तिचे लग्न होईपर्यंत 75 हजार रुपये देण्यात यावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. तसेच करुणा शर्मा- मुंडे यांचे अभिनंदनही केले आहे.
'करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि1, 25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.. असे अंजली दमानियांनी म्हटले आहे.
नक्की वाचा - Shirish More : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, संघाचे प्रचारक, हभप शिरीष मोरेंनी गळफास घेत संपवलं जीवन