Tulja Bhavani Mandir: भाविकांनी लक्ष द्या! तुळजाभवानीचे मुख्य प्रवेशद्वार बंद, गर्दीमुळे मोठा निर्णय

घाटशीळ पार्किंग (Ghatsheel Parking) बाजूकडून मंदिरात सोडण्यात येणार आहे. या पर्यायी मार्गातून भाविकांचे दर्शन सुलभ करण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासन करत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, धाराशिव:

Tuljabhavani Devi Temple Mandir Closed:  महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीच्या (Tulja Bhavani Devi) मंदिरात दिवाळीच्या (Diwali) सुट्ट्या आणि सणांच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी (Huge Crowd) केली आहे. वाढलेली ही विक्रमी गर्दी लक्षात घेता, मंदिर संस्थानाने (Temple Trust) भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Tuljapur Tulja Bhavani Mandir News) 

मुख्य प्रवेशद्वार दोन दिवसांसाठी बंद

मंदिर संस्थानाच्या घोषणेनुसार, आज (शनिवार) आणि उद्या (रविवार), असे दोन दिवस मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार (Main Entrance) भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या दोन दिवसांमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना घाटशीळ पार्किंग (Ghatsheel Parking) बाजूकडून मंदिरात सोडण्यात येणार आहे. या पर्यायी मार्गातून भाविकांचे दर्शन सुलभ करण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासन करत आहे.

IKEA ची पु्ण्यात एन्ट्री; मोठी जागा भाड्याने घेतली; भाडं ऐकून थक्का व्हाल!

२०० रुपयांचे दर्शन पास बंद

भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी (Crowd Management) २०० रुपयांचे सामान्य (General) आणि रेफरल (Referral) दर्शन पास देखील पुढील दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सर्व भाविकांना एकाच रांगेतून (Queue) दर्शनासाठी जावे लागणार आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता राखून देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर संस्थानाने केले आहे.

अकोल्यातील श्रद्धावान भाविक सतीश पिंपळे आणि त्यांच्या पत्नी पद्मा पिंपळे यांनी अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमातून श्री तुळजाभवानी देवींचे अत्यंत सुंदर असे चित्र रेखाटले. त्या चित्राची आकर्षक फ्रेम तयार करून त्यांनी ते चित्र श्री तुळजाभवानी देवीजींच्या चरणी सादर करत आपला सेवाभाव अर्पण केला. सेवाभावाने साकारलेले हे अप्रतिम चित्र पाहून सर्व भाविक भारावून गेले. या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे पिंपळे दांपत्यांचा देवीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी तसेच पुजारी बांधव उपस्थित होते.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)