Dr. Dy Patil Passed Away: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे वडील, बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानेदव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. आपल्या कोल्हापूरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठे योगदान होते. ते डी वाय पाटील समूहाचे संस्थापक होते. हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांची स्थापना केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले.
डॉ. डी वाय पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 रोजी झाला. डी. वाय पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. काहीकाळाने त्यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होत आपले पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रामध्ये घातले. डी. वाय पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात शाळा. महाविद्यालयांचे जाळे निर्माण केले. डी. वाय पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्याचबरोबर विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्यासह कन्या डॉ. नंदिता पालशेतकर या शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असतात. त्यांचे नातू ऋतुराज पाटीलही राजकारणात सक्रिय झाले आहेत.
Udhayanidhi Stalin: ब्रेकिंग! माजी उपमुख्यमंत्री स्टॅलिन यांना अटक; तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ
उपमुख्यत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली!
"महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे महान शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि शैक्षणिक विश्वावर शोकाकळा पसरली आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रद्धांजली वाहिली आहे. केवळ संस्था उभ्या न करता, 'Academic Excellence' आणि 'Holistic Education' या तत्त्वांवर आधारित शिक्षण देऊन त्यांनी देशातील उच्च शिक्षणाला एक नवी दिशा दिली. आज डी. वाय. पाटील विद्यापीठात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, फार्मसी, लॉ, आर्किटेक्चर अशा १६ हून अधिक विद्याशाखांमध्ये १४६ हून अधिक अभ्यासक्रम चालवले जातात. संपूर्ण देशात तब्बल ७ स्वतंत्र विद्यापीठे उभी करण्याचा अद्वितीय आणि ऐतिहासिक विक्रम त्यांच्याच नावावर आहे" असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.