राज्यातल्या महापालिकां निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. नुकत्याच राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या आहेत. त्याचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. या निवडणुका संपत नाही तोच राज्य निवडणूक आयोग आज महापालिका निवडणुकींची घोषणा केली आहे. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर लगेचच 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आज 15 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
Live Update: महापालिकांचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
राज्यातील मुंबईसह २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरणे - २३ डिसेंबर
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस - ३० डिसेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी - ३१ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याचे मुदत - २ जानेवारी
चिन्ह वाटप - ३ जानेवारी
मतदान - १५ जानेवारी
मतमोजणी - १६ जानेवारी
आजपासून आचारसंहिता लागू
मतदान - 15 जानेवारी 2026
मत मोजणी - 16 जानेवारी 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी-
23-30 डिसेंबर 2025
छाननी- 31 डिसेंबर
उमेदवारी माघार-
2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवार अंतिम यादी - 3 जानेवारी 2026
प्रचार कालावधी - 3 ते 13 जानेवारी
एकूण 29 मनपा
27 मनपा ची मुदत संपली आहे.
जालना व इचलकरंजी मनपा नवीन महापालिका - यंदाची पहिलीच निवडणूक
मुंबई महानगर पालिकेत1 प्रभाग सदस्य रचना
28 मनपा -बहू सदस्यीय रचना
एका मतदारांस
28 मनपात 3/4/5 मतदान करावे लागणार
एकूण मतदार- 3 कोटी
मतदार यादी 1 जुलै 2025 ची ग्राह्य धरणार.
49 हजार पेक्षा अधिक मतदार केंद्र
Live Update- 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार
48 तास आधी प्रचार संपणार
एकूण - 29 मनपा
नगरसेवकांच्या एकूण जागा - 2869
महिला - 1442
अ. जाती - 341
अ.जमाती - 77
ओबीसी. - 749
Live Update: 29 महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम
29 महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्जाची छाननी - 31 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026
मतदान - 15 जानेवारी 2026
मतमोजणी - 16 जानेवारी 2026
Live Update: महापालिका निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर
29 महापालिकांसाठी 15 जानेवारीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारीला मतमोजणी. नामनिर्देश पत्र २३ ते ३० डिसेंबरला होणार. छाननी ३१ डिसेंबर. उमेदवारी माघारीची मुदत २ जानेवारी २०२६ असेल. निवडणूक चिन्ह वाटत व अंतिम उमेदवारींची यादी ३ जानेवारी २०२६. मतदानाचा दिनांक १५ जानेवारी २०२६. मतमोजणीची तारीख १६ जानेवारी २०२६ असेल.
LIVE Update: महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान
29 महापालिकांसाठी 2869 एकूण जागांवर मतदान होणार आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
LIVE Update: महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान
29 महापालिकांसाठी 2869 एकूण जागांवर मतदान होणार आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
Live Update: स्टार प्रचारकांची संख्या २० वरून ४० वर
स्टार प्रचारकांची संख्या २० वरून ४० करण्यात आली आहे असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
Live Update: जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी खास सोय मतदान केंद्रावर
Live Update: दिव्यांग, जेष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना मतदान केंद्रावर प्राधान्य दिलं जाणार आहे. शिवाय सर्व सोई सुविधा मतदान केंद्रावर देण्यात येणार आहेत. काही आदर्श मतदान केंद्र असतील असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. काही मतदान केंद्रावर महिला असतील. १ लाख ९६ हजार कर्मचारी या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आली आहेत.
LIVE Update: दुबार मतदार काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळले - आयोग
LIVE Update: दुबार मतदार काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. मुंबई महापालिकेत ही प्रमाण अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं.
LIVE Updte: मतदार यादी ही 1 जुलैची ग्राह्य धरली जाणार- निवडणूक आयोग
1 कोटी 83 हजार पुरूष मतदार असतील. तर 1 कोटी 21 हजार महिला मतदार मतदान करतील. तर 450 इतर मतदार असतील. एकूण 39 हजार मतदान केंद्र असतील. इलेक्ट्रॉनिक मशिनवर मतदान होती.
मुंबई महापालिकेसाठी 10 हजार मतदान केंद्र असतील. मुंबईत कंट्रोल युनिट 11 हजार असतील. मतदान यादी १ जुलै ही तारीख निश्चित केली आहे.
LIVE Update: प्रभाग रचनेनुसार 28 महापालिकांमध्ये निवडणूक होणार
LIVE Update: प्रभाग रचनेनुसार 28 महापालिकांमध्ये निवडणूक होणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी चार तर काही ठिकाणी तीन प्रभाग असतील असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Live Update: राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
निवडणूक आयोगाची लाईव्ह पत्रकार परिषद
LIVE Update: महापालिका निवडणुकांची घोषणा होणार
LIVE Update: मुंबईसह राज्यातल्या महत्वाच्या महापालिका निवडणुकांची घोषणा थोड्याच वेळात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.