लक्ष्मण सोळुंके, जालना
Jalna News : मुलीची छेड काढली म्हणून जाब विचारायला गेलेल्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जालना शहरातील यमुना रेसिडन्सीमध्ये ही घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची छेड काढल्याने तिचे कुटुंबीय जाब विचारण्यासाठी गेले होते. जाब विचारताच समोरील व्यक्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली. छेड काढणारे वाळू माफीया असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी चंदझिरा पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वाळू माफिया असलेल्या सचिन पठाडे आणि गणेश काकडे या दोन जणांना ताब्यात घेतले असून इतर 7 आरोपी फरार आहेत. इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.