विशाल पुजारी, कोल्हापूर: महायुती सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढत आहे. हा महामार्ग जाणाऱ्या 12 जिल्ह्यातील बाधीत शेतकऱ्यांसह, विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्षांनी याला कडाडून विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज कोल्हापुरातील पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर चक्कजाम आंदोलन होणार आहे. शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर महामार्ग रोको आंदोलन करत प्रस्तावित महामार्गाच्या विरोधात आज शेतकरी, नेते एकजूट होणार आहेत.. सकाळी दहा वाजल्यापासून हे आंदोलन सुरु होईल.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात असून हजारो शेतकरी भूमीहिन होणार आहेत. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असून या विरोधात रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने कंबर कसली आहे.
Cabinet Decision : शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता! वाचा राज्य सरकारचे सर्व निर्णय