Gokhale Institute : गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आर्थिक अनियमितते प्रकरणात मोठी कारवाई,  SIS च्या सचिवांना अटक 

अजित रानडे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Pune Gokhale Institute : पुण्याचे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (डीम्ड युनिव्हर्सिटी) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अजित रानडे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. 

गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आर्थिक अनियमितते प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सर्व्हंट्स सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. डेक्कन पोलिसांनी कारवाई करत कोट्यवधी रुपयांच्या निधी गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या संचालक पदावरून डॉ. अजित रानडे यांची अचानक गच्छंती झाल्यानंतर ही महत्त्वपूर्ण घटना उघडकीस आली आहे. अजित रानडे यांची गच्छंती झाल्यानंतर ही मोठी घटना आहे. 

बातमी अपडेट होत आहे.