सुनील दवंगे, शिर्डी: शिर्डीतील व्हीआयपी कल्चर रोखण्यासाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे आक्रमक झालेत. साई बाबांचे व्हिआयपी दर्शन बंद करा अशा मागणीचे निवेदन ते शिर्डी संस्थानला देणार असून एका महिन्यात यावर कार्यवाही न झाल्यास कडक उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे साई संस्थान यावर काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डीमध्ये व्हीआयपी साईदर्शनाचा गोरख धंदा बंद करण्यासाठी आता भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील नवीन शक्कल लढवण्याच्या तयारीत आहेत. पहाटेच्या काकड आरतीनंतर पुढील दोन तासच फक्त व्हीआयपी दर्शन द्यावे, दिवसभर चालणार व्हीआयपी दर्शन बंद करावे अशी मागणी सुजय विखे यांनी शिर्डी संस्थान केली आहे. आठवडा भरात याबाबतच निवेदन देवून संस्थानला एक महिन्याचा कालावधी देणार मात्र त्यानंतर ही दिवसभराच व्हीआयपी कल्चर बंद झाले नाही तर स्वतः साई संस्थान विरोधात शिर्डीत उपोषणला बसणार असल्याचा इशारा सुजय विखे यांनी दिला आहे.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी सरासरी 50- 60 हजार भाविक दररोज हजेरी लावतात. यासाठी साई संस्थानच्या वतीनं वर्षानुवर्षे अधिकृत व्हीआयपी दर्शन व्यवस्था राबवली जाते. पहाटेच्या काकड आरतीसाठी प्रति भाविक 500, मध्यान्ह, धुपारती आणि शेजारती साठी प्रत्येकी 400 तसेच दिवसभराच्या दर्शनासाठी प्रति व्यक्ती 200 रुपये शुल्क आकारणी केली जाते.. या माध्यमातून संस्थानला वर्षाकाठी कोट्यावधी रुपये मिळतात.
(नक्की वाचा- नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)
अलिकडे यात काही अपप्रवृत्ती शिरला असून अनेकदा व्हीआयपी दर्शन पासेसचा काळाबाजार होतो. मात्र साई संस्थानन यासाठी वेळोवेळी सुधारणा देखील केली. आता ही दिवसभराची व्हीआयपी दर्शन व्यवस्थाच बंद करण्याची माणगी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी करत शिर्डी ग्रामस्थांच्या मदतीनं संस्थान निवेदन देणार असून महिनाभराचा कालावधी देणार, मागणी मान्य न झाल्यास सुजय विखे यांनी स्वतः उपोषणला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
(नक्की वाचा- Traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा)