Jagdeep Dhankhar: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 23 जुलैपासून गायब? धक्कादायक दाव्याने खळबळ

देशाच्या माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा खासदारांना व राजकीय कार्यकर्त्यांना नाही, ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Saamana Editorial On Jagdeep Dhankhar: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांनी केंद्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोग आणि भाजपने मतांची चोरी केल्याचा थेट दावा राहुल गांधींनी केला आहे. यावरुनच दिल्लीमध्ये वातावरण तापले असतानाच आता संजय राऊत यांच्या नव्या दावाने खळबळ उडाली आहे. राजीनामा दिल्यापासून देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता असल्याचा दावा सामनामधून करण्यात आला आहे.

Pune Metro: 'मेट्रो लाईन- 3' चा उरळी कांचनपर्यंत विस्तार होणार, अजित पवारांंनी मांडला प्रस्ताव 

काय आहे 'सामना'मधील दावा?

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. उपराष्ट्रपती धनखड यांनी 21 जुलै रोजी संसदेच्या पहिल्या दिवशी राजीनामा दिला व तेव्हापासून जगदीप धनखड यांचा कोणाशी संपर्क आणि संवाद नाही. धनखड राजीनामा दिल्याच्या दिवसापासून गायब आहेत. संसदेतील अनेक खासदारांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण धनखड हे जणू अदृश्य झाले. देशाच्या माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा खासदारांना व राजकीय कार्यकर्त्यांना नाही, ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

तसेच धनखड यांना त्यांच्या राहत्या घरी 'बंदी' बनवून ठेवले. ते हाऊस अरेस्ट आहेत. त्यांच्या नातेवाईकांशीही त्यांचा संपर्क होऊ देत नाहीत, असे दिल्लीतील राजकीय वर्तुळातून सांगितले व ते खरे वाटते. आपल्याला नको असलेले विरोधक गायब करण्याची, तुरुंगात डांबण्याची, त्यांचा काटा काढण्याची पद्धत चीन व रशियासारख्या कम्युनिस्ट देशांत आहे. भगवेकरण सुरू असलेल्या भारतात ही पद्धत आता सुरू झाली असेल तर राहुल गांधींसह इतर सगळ्यांनीच सावध राहायला हवे. लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या भाजपच्या भीष्म पितामहालाही अशाच पद्धतीने गप्प केले गेले. आता राजीनामा दिलेले उपराष्ट्रपती धनखड गायब झाले. भारताची राजकीय व्यवस्था बिघडली आहे.

Vasai News: माजी मनपा आयुक्तांचा नवा कारनामा समोर! ड्रायव्हरच्या 4 मुलांना दिल्या पालिकेत नोकऱ्या