Pune Metro News: पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज! प्रजासत्ताक दिननिमित्त मेट्रोची खास ऑफर; फक्त 20 रुपयात...

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे मेट्रो प्रशासनाने पुणेकरांसाठी एक खास भेट दिली आहे. ज्यामुळे त्यांचा प्रवास अगदी स्वस्तात होणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

 Pune Metro Republic Day Special Offer: प्रजासत्ताक दिन अवघा एका दिवसांवर आला असून देशभरात या खास सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात तिरंगी रंगांची उधळण करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. अशातच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे मेट्रो प्रशासनाने पुणेकरांसाठी एक खास भेट दिली आहे. ज्यामुळे त्यांचा प्रवास अगदी स्वस्तात होणार आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुणे मेट्रो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. प्रजासत्ताक दिनानिमित्त मेट्रो प्रशासनाने पुणेकरांसाठी विशेष सवलत आणली आहे.  पुणे मेट्रोचे 'एक पुणे ट्रांझिट कार्ड'   26जानेवारी 2025 रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी सवलतीमध्ये उपलब्ध असणार आहे. पहिल्या 5000 प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह हे कार्ड उपलब्ध असणार आहे.

Advertisement

118 रुपये शुल्क असणारे हे कार्ड 26 जानेवारी रोजी प्रवाशांसाठी केवळ 20 रुपयांत उपलब्ध असणार असल्याची माहिती पुणे मेट्रो प्रशासनाने दिली आहे.  या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार 10 टक्के सवलत आणि शनिवार-रविवारी 30 टक्के सवलत मिळणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी मेट्रोचा वापर करावा, यासाठी ही खास सोय प्रजासत्ताकदिनी पुणे मेट्रोने दिली आहे.

( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात?

दरम्यान,  हे कार्ड खरेदी करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल. आपल्या जवळच्या मेट्रो स्थानकावर भेट देऊन हे कार्ड खरेदी करावे, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे.