Mumbai News: मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार! राज्यमंत्री पंकज भोयर यांची मोठी घोषणा

जेथे जेथे अडचणी आहेत तेथे त्या दूर करून पुनर्विकासाला गती दिली जाईल, असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Assembly Winter Session News:  मुंबईतील प्रत्येक पात्र नागरिकाला घर देण्यासाठी शासन सकारात्मक असून जिथे जिथे अडचणी असतील त्या दूर करून पुनर्विकासाला गती देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दे बोलत होते. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना घरे देण्याचा  संकल्प केला आहे, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मुंबईतील प्रत्येक पात्र नागरिकाला घर देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. जेथे जेथे अडचणी आहेत तेथे त्या दूर करून पुनर्विकासाला गती दिली जाईल, असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

Shivraj Patil Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन

सदस्य प्रवीण दरेकर यांनी पुनर्विकास विषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ.भोईर म्हणाले की, मुंबईतील दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईतील १३,८०० जुन्या मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतीतील मुंबईकरांच्या घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरात लवकर सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

Advertisement

म्हाडा पुनर्रचित ३८८ इमारतींच्या पुनर्विकासासाठी अडचणी दूर करण्यात येतील. सर्वसामान्यांच्या घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे. तसेच या प्रश्नांबाबत शासन तातडीने उपाययोजना करणार आहे. मुंबईतील विविध भागातील १३,८०० भाडेकरूंच्या इमारतींचा पुनर्विकास प्राधान्याने होणार असून न्यायालयीन अडथळे दूर करण्यासाठी कायदेशीर पावले उचलली गेली आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गुड न्यूज! कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात GCC स्थापन होणार; जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा मिळणार