VIDEO: नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने! मंदिरांमध्ये गर्दी... मुंबई ते दुबई कसं झालं सेलिब्रेशन? पाहा व्हिडिओ

नववर्षाच्या पहिल्या दिवसाची देवदर्शनाने करण्यासाठी नागरिकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे राज्यभरातील मंदिरे भाविकांनी फुलून गेली असून भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

New year Celibration VIDEO:  जगभरात आज नवीन वर्ष २०२६  मोठ्या जल्लोषात स्वागत केले जात आहे. मध्यरात्री  फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष करत सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे स्वागत करण्यात आले. दुसरीकडे नववर्षाच्या पहिल्या दिवसाची देवदर्शनाने करण्यासाठी नागरिकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे राज्यभरातील मंदिरे भाविकांनी फुलून गेली असून भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. 

रात्री १२ चे ठोके पडताच आसमंत फटाक्यांच्या आवाजाने आणि प्रकाशाने उजळून निघाला. मुंबईत नववर्षाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रात्री बारा वाजता प्रवाशांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वे स्थानकाच्या देखण्या इमारतीवर केलेली आकर्षक रोषणाई आणि उपस्थितांनी केलेला जल्लोष यामुळे वातावरण भारावून गेले होते. तिकडे दादरच्या शिवाजी पार्क परिसरातही स्थानिकांनी फटाक्यांची मोठी आतषबाजी करून २०२६ चे स्वागत केले.

​जागतिक स्तरावर दुबईतील बुर्ज खलिफा येथील सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे जगातील सर्वात मोठा लाईट अँड साऊंड शो आणि भव्य आतिशबाजी करण्यात आली. पर्यटनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या हजारो लोकांनी या विलोभनीय दृश्याचा अनुभव घेतला. या भव्य दिव्य लाईट शोचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

विठुरायाच्या मंदिरात आकर्षक सजावट

इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागताला पंढरपुरात भक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी. या हेतूने प्रत्येक वारकरी विठ्ठल भक्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हजेरी लावतोय. त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी सुमारे चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. इंग्रजी नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी आकर्षक अशी फुलांची सजावट देखील केली आहे.

Advertisement

 त्याचबरोबर  प्रभादेवी येथील मुंबईचं आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी गर्दी केली आहे.  यंदा 3 ते 4 लाख भाविकांच्या गर्दीची अपेक्षा असून, मंदिर न्यासाकडून भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

तुळजाभवानी मंदिरातही भाविकांची गर्दी...

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर येथील मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.आजपासून २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात होत असून, वर्षाची पहिलीच सकाळ देवीच्या दर्शनाने पावन करण्यासाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक तुळजापूरकडे दाखल झाले आहेत. नववर्ष सुख-समृद्धी, आरोग्य आणि यशाचे जावे, यासाठी भाविक देवीचरणी मनोभावे प्रार्थना करताना दिसत आहेत. 

मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण असून “आई राजा उदो उदो”च्या जयघोषाने संपूर्ण तुळजापूर दुमदुमून गेले आहे. सध्या आई तुळजाभवानी देवीचे शाकंभरी नवरात्र उत्सव देखील सुरू असून त्यातच नवीन वर्षाचा आजचा हा दिवस आल्याने भाविक मंदिरात दाखल होत असून सुरळीत दर्शनासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आई तुळजाभवानीच्या दर्शनानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनाने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि श्रद्धेचा भाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

Advertisement