Mumbai Rain: मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचे तुफान! पुढील 3 तास महत्त्वाचे; हवामान विभागाकडून अलर्ट

मुंबईकर सुखावले असून उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने पुढील चार तीन तास मुंबई, रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Mumbai Rain IMD Alert News: आठवडाभरापासून दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रीय झाला आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून तुफान पाऊस बरसत आहे. शहरातील साकीनाका, अंधेरी, जोगेश्वरी बोरिवली सायन, भांडुपमध्ये तुफान सरी बरसल्या. पावसाच्या या दमदार पुनरागमनाने मुंबईकर सुखावले असून उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने पुढील चार तीन तास मुंबई, रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 

FIFA WC 2026: मेस्सीचं स्वप्न भंगलं! स्पेन विश्वविजेता; 16 वर्षांनंतर फुटबॉल चॅम्पियन

राज्यात पावसाची पुन्हा एन्ट्री

​राज्यात गेल्या काही दिवसांपासून काहीसा स्थिरावलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहणार असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

​हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा 'रेड अलर्ट' सदृश स्थिती निर्माण होऊ शकते. येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील चार दिवस तुफान बरसणार! 

​विभागवार स्थिती पाहता, २० जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर असेल, तर मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल. प्रशासनाने नागरिकांना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Samruddhi Accident: 'समृद्धी'वर भयंकर अपघात! अपघातग्रस्त ट्रकला कारची धडक; 6 जणांचा होरपळून मृत्यू