कोकणात मुसळधार! राजापूर शहराला पुराचा वेढा, सिंधुदुर्गातही पावसाची जोरदार बॅटींग

राजापूर शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. तर सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी पुराचे पाणी घरात घुसले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

गुरूप्रसाद दळली/राकेश गुडेकर 

रत्नागिरीसह सिंधुदुर्गालाही पावसाने चांगलेच झोडपले आहे. राजापूर शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. तर सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी पुराचे पाणी घरात घुसले आहे. शिवाय मुंबई गोवा हायवेवरही काही ठिकाणी पाणी आले आहे. सिंधुदुर्गात जे लोक पुराच्या पाण्यात अडकले होते त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दिवसभर पावसाने कोकणाला चांगलेच झोडपले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राजापूर शहरात पाणी घुसले  

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून पाऊस मुसळधार बरसत आहे. मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने राजापूर शहराला पुराचा वेढा पडला आहे. जवाहर चौकात पुराचं पाणी घुसलं आहे. जवाहर चौकात अडीच ते तीन फूट पाणी आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरही पाण्याखाली गेला आहे. वरची पेठ भागाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. शहराच्या अनेक भागात पुराचं पाणी घुसलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - वरळीत हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचा नेता पोलिसांच्या ताब्यात, तर मुलासह दोघांना अटक

रत्नागिरीत जोरदार पाऊस

शीळ,गोठाणे दोनीवडेकडे जाणारा मार्ग अर्जुना नदीच्या पुराखाली गेला आहे. पुराच्या दृष्टीने राजापूर शहर बाजारपेठेतील  व्यापाऱ्यांची धास्ती वाढली आहे. पुराच्या भीतीने व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवायला आगोदरच सुरुवात केली होती. महापुराचे पाणी जवाहर चौकात वाढत होते. शहरातील गणेश घाट, शिवाजी पथचा आठवडा बाजाराकडील रस्ता पाण्याखाली गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. तर राजापूर तालुक्यात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झालं आहे.

ट्रेंडिंग बातमी -  मविआत मोठा भाऊ कोण? पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच थेट बोलले

सिंधुदुर्गलाही पावसाने झोडपले 

रत्नागिरी प्रमाणे सिंधुदुर्गातही पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. जिल्ह्यातल्या हुमरमळा जवळ मुंबई गोवा महामार्ग हा पाण्याखाली गेला आहे. तर हाथेरी नदीने आपली पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीचे पाणी शेतात आणि घरात घुसले आहे. अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहील्यास जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आहे. 

Advertisement