Maharashtra Board SSC 10th Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपवली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी (८ मे) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी, सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या वतीने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन निकालाची आकडेवारी स्पष्ट केली जाणार आहे.
यंदाही राज्य मंडळाने निकालाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करत आपली परंपरा कायम राखली आहे. २ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत दहावीचा निकाल सादर केला जात आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक यांसह नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
यामुळे पुढील अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जूनच्या सुरुवातीलाच शैक्षणिक वर्ष नियमितपणे सुरू करणे शक्य होणार आहे. पूर्वी जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागणारे हे निकाल आता मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात लागत असल्याने विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला आहे.
Mumbai News: मुंबईत BMC अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप; आझाद मैदान पोलीस ठाण्यात FIR दाखल
दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? Result Website List
-
https://sscresult.mahahsscboard.in/
-
https://results.digilocker.gov.in
-
https://mahahsscboard.in
-
https://sscresult.mkcl.org
-
https://results.targetpublications.org
-
https://results.navneet.com
निकाल पाहण्याच्या सोप्या स्टेप्स: (How Check Result Step By Step Process)
-
सर्वात आधी मंडळाच्या mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
-
होमपेजवर 'SSC Result 2026' या लिंकवर क्लिक करा.
-
तुमचा 'रोल नंबर' आणि 'आईचे नाव' टाकून लॉग इन करा.
-
'सबमिट' बटण दाबताच तुमचा निकाल समोर येईल.
-
निकालाची प्रिंट काढून जपून ठेवा.
दरम्यान, उद्या मिळणारे गुणपत्रक हे केवळ तात्पुरते असेल. तुमच्या शाळेत अधिकृत गुणपत्रक केव्हा मिळेल, याची तारीख मंडळ लवकरच जाहीर करेल. त्यामुळे उद्या निकाल पाहिल्यानंतर पुढील प्रवेशाच्या तयारीला लागा!
Tamil Nadu: TVK चे 108 आमदार राजीनामा देणार? तामिळनाडूत राजकीय भूकंप, सत्तासंघर्ष पेटला