Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. राज्यात कोकण किनारपट्टी, पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील ३ ते ४ दिवस मान्सून सक्रिय राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पालघर, ठाणे, रायगड तसेच सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन घाटमाथ्यातील नागरिक आणि प्रवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Palghar School Holiday: पालघरमध्ये मुसळधार पाऊस! या 3 जिल्हांतील शाळा-महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर
महाराष्ट्रात मुसळधार.. घाटमाथ्यावर रेड अलर्ट!
हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या आणि चिंताजनक अंदाजानुसार, शुक्रवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार मेघगर्जना आणि अतिवृष्टीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, तर काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. हवामानाचा बिघडलेला मिजास पाहता प्रशासनाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचे इशारे (Alerts) जारी केले आहेत. त्यानुसार पुणे घाट परिसरात सर्वाधिक धोक्याचा 'रेड अलर्ट' घोषित करण्यात आला आहे.
कुठे कुठे ऑरेंज अलर्ट?
पालघर, ठाणे, रायगड, तसेच नाशिक आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. दरम्यान, राजधानी मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर घाट परिसर आणि विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)