Heatwave Warning: सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडू नका, मुंबई ठाण्यासह 3 जिल्ह्यांना अलर्ट; कोणती काळजी घ्याल?

गेल्या पाच वर्षांतील मार्च महिन्यातील उच्चांकी तापमान ठरले आहे. पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही सोमवारी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

IMD heatwave Warning: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) 'येलो अलर्ट' जारी केला आहे. सोमवारी आणि मंगळवारी काही भागांत तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घराबाहेर पडू नका,  हिटवेवचा अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सांताक्रूझ येथे ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, मंगळवारी हे तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, गेल्या १० मार्च रोजी मुंबईत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जे गेल्या पाच वर्षांतील मार्च महिन्यातील उच्चांकी तापमान ठरले आहे. पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही सोमवारी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार आहे.

Advertisement

Toll Waiver: मोठी गुडन्यूज! मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर 3 दिवस टोलमाफी; कसा अन् कोणाला मिळणार लाभ? वाचा....

एकीकडे कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि कोरड्या हवामानाचे सावट असताना, राज्याच्या अंतर्गत भागात मात्र हवामानाचे वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीवर उष्णता आणि देशावर पाऊस असे द्वैध सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

उष्णतेच्या लाटेचा सामना कसा करावा? | How to deal with Heatwave

  •  पुरेसे पाणी प्या; तहान लागली नसली तरीही शक्य तेवढे वारंवार पाणी पीत राहा.
  •  'ओरल रिहायड्रेशन सोल्युशन' (ORS) आणि घरी बनवलेली पेये जसे की लस्सी, तोराणी (भाताचे पाणी/पेज), लिंबू पाणी आणि ताक  यांचे सेवन करा.
  • हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे आणि सैल सुती कपडे परिधान करा.
  • जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  •  आपले कामगार दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर किंवा उन्हामध्ये  काम करणार नाहीत याची काळजी घ्या.

अहिल्यानगरची लेक भोंदूबाबाचा काळ ठरणार; 'खरात'चा छडा लावणाऱ्या IPS तेजस्वी सातपुतेंचा जबरदस्त इतिहास