पाटील विरुद्ध पाटील, नवी पिढी जुना संघर्ष, सांगलीत वादाचा दुसरा अध्याय सुरू

सांगली लोकसभा काँग्रेसला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सुत्र हलवली होती असा आक्षेप काँग्रेसचा आहे. त्यानुसार विधानसभेत त्याचे सर्व हिशोब चुकते करण्यासाठी काँग्रेस सरसावली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
सांगली:

महाविकास आघाडीत सांगली लोकसभेवरून वाद निर्माण झाला होता. काँग्रेसने दावा केलेली ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या पारड्यात पडली. पण त्यानंतर ही काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत विजयही मिळवला. त्यानंतर या विषयावर पडदा पडेल असे वाटत होते. मात्र आता लोकसभा निवडणूक झाली आहे. विधानसभा निवडणूक काही महिन्यावर आहे. या पार्श्वभूमीवर आता सांगलीत वादाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. सांगली लोकसभा काँग्रेसला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सुत्र हलवली होती असा आक्षेप काँग्रेसचा आहे. त्यानुसार विधानसभेत त्याचे सर्व हिशोब चुकते करण्यासाठी काँग्रेस सरसावली आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इस्लामपूर-वाळवा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदार संघ आहे. या  मतदारसंघावर या पुढच्या काळात आपलं विशेष लक्ष राहील. शिवाय आता नवीन निर्णय घ्यावे लागतील, अश्या शब्दात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. जयंत पाटलांच्या मतदारसंघातील कसबे डिग्रज येथे आयोजित सत्कार समारंभात विशाल पाटल बोलत होते. यावेळी बोलताना पुढची दिशा काय असेल हेच स्पष्ट केले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  'लोकसभा निवडणुकीत माझी फसवणूक झाली', राजू शेट्टींनी ठाकरे -पवारांना घेरले

सांगलीचे नवनिर्वाचीत खासदार विशाल पाटील यांच्या विजया निमित्ताने कसबे डिग्रज येथे सत्कार समारंभ पार पडला. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे सांगली लोकसभा मतदार संघात नसणारे कसबे डिग्रज हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील गाव आहे. यावेळी बोलताना अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम आघाडीत असल्यामुळे ते काही बोलू शकत नाहीत. पण मी अपक्ष खासदार असल्याने काहीही करू शकतो.आपण दिल्लीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. पण अपक्ष खासदार म्हणून या इस्लामपूर मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मतदार संघातील सगळ्यांची मोट बांधण्याची जबाबदारी माझी आहे.  सांगली लोकसभा मतदारसंघातल्या गावांत सत्कार व्हायचा असताना, तुमच्या गावात येऊन सत्कार स्वीकारतोय. यावरुन तुम्ही ओळखले पाहिजे, पुढची दिशा काय असणार आहे. असं सूचक वक्तव्य विशाल पाटील यांनी केले आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'EVM मशीन हटवा', एलन मस्क असं का म्हणाले? कुठल्या निवडणुकीत झाला होता गोंधळ?

यावेळी विश्वजित कदम यांनीही जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष पणे टिका केली. आपण, विशाल पाटील आणि जयश्रीताई पाटील खंबीरपणे कसबे डिग्रज मधल्या जनतेच्या पाठीशी आहोत. कसबे डीग्रजवर जेवढे लक्ष आमचं नव्हते, त्याच्या दहा पटीने येणाऱ्या काळात लक्ष देऊ असेही कदम यावेळी म्हणाले. शिवाय यातून कोणाला काय अर्थ काढायचा आहे तो काढावा. आम्हाला कशाची ही परवा नाही. कारण चांगली माणसं आमच्या सोबत आहेत. अश्या शब्दात विश्वजित कदम यांनीही जोरदार फटकेबाजी केली. सांगली लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर थेट जयंत पाटलांच्या मतदारसंघात जाऊन विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी सत्कार स्वीकारत केलेली वक्तव्ये सांगली जिल्ह्यातील राजकारणात नव्या संघर्षाचे ठिणगी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Advertisement