2 months ago

Independence Day 2025 Live Updates: आज भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन. आजच्याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून  देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा ऐतिहासिक, सुवर्णदिन देशभरात मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त अवघा देश तिरंगी रंगात न्हावून निघाला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात येईल, त्यानंतर ते देशाला संबोधित करतील. दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान तसेच मंत्रालयात ध्वजारोहण करतील.

Aug 15, 2025 19:04 (IST)

Live Updates: पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या बैठकीत गोंधळ

पवनचक्कीच्या मुद्द्यावरून खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना पक्षाचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील यांच्यात जुंपली

बाचाबाची सुरू होताच प्रताप सरनाईक यांनी ही घेतली बैठक आटोपती

आनंद पाटील पवनचक्कीच्या कामासंदर्भात तक्रारी करत असताना ओमराजे यांनी हटकल्याने वाद

तुमच्या जागजी येथील पवनचक्कीचे प्रकरण असून तुमचेच मामा गुत्तेदार आहेत असे उद्गार काढताच पाटील याने ओमराजे ना काढताच दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली

तर शेतकऱ्यांचे प्रश्न आधी सोडू द्या मग राजकीय नेत्यांनी बोला ओमराजेंनी बोलण्यास केला होता पाटील याला मज्जाव

Aug 15, 2025 18:23 (IST)

यापुढे शक्तीपीठसाठी मोजणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू - राजू शेट्टी

यापुढे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा महामेळावा सांगलीच्या बुधगाव मध्ये पार पडला.यावेळी खासदार विशाल पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.या निमित्त बोलताना राजू शेट्टींनी शक्तीपीठ महामार्गाचा घाट सरकार भांडवलदारांच्या साठी घालतोय,मात्र यापुढे या शक्तीपीठला तीव्र विरोध केला जाईल,रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शक्तीपीठ विरोधात लढू,असं देखील राजू शेट्टींनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Aug 15, 2025 18:23 (IST)

Live Update: पवईत घराची भिंत कोसळली, 1 जण गंभीर जखमी

पवई आय आय टी फुले नगर येथील एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली असून, या घटनेत त्या घराशेजारून जाणाऱ्या दिनेश विश्वकर्मा हे ५० वर्षीय रहिवासी गंभीर जखमी झाले आहे. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्यावर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू असून अग्निमशन दल पोलिस घटना स्थळी दाखल झाले आहे.

Aug 15, 2025 18:21 (IST)

सेनगाव तालुक्यातील कहाकर टाकतोडा या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस

 हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक ताकतोडा या गावांमध्ये आज दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल आहे.. या भागात पडलेल्या पावसामुळे छोट्या मोठ्या ओढ्यांना पूर आल्याने हे पाणी थेट शेतामध्ये घुसून शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाला आहे..

Advertisement
Aug 15, 2025 15:33 (IST)

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत  बिघडली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी त्या आधी एक सभा ही घेतली होती. त्यांना आज अचानक भोवळ आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

Aug 15, 2025 15:29 (IST)

News update: प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ

प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ 

खेवलकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल 

महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

पुणे सायबर पोलिसांनी दाखल केलाय गुन्हा 

चोरून वीडियो काढल्याची महिलेची तक्रार

Advertisement
Aug 15, 2025 13:29 (IST)

LIVE Updates: सर्वोच्च न्यायालयाच्या श्वानांसाठीच्या निर्णयाच्या विरोधात पुण्यात आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाच्या श्वानांसाठीच्या निर्णयाच्या विरोधात पुण्यात आंदोलन

दिल्लीतल्या श्वानांना शिफ्ट करू नका 

त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे 

३ लाख कुत्र्यांना कोण खायला देणार ? त्यांची व्यवस्था कोण करणार 

पालिकेने कुत्र्यांची नसबंदी करावी म्हणजे त्यांची लोकसंख्या वाढणार नाही 

पुण्यात श्वानप्रेमींकडून आंदोलन

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतल्या सर्व  भटक्या श्वनानंना एकत्रित रित्या  आश्र्यासाठी ठेवा भटके श्वान दिल्लीतल्या रस्त्यावर दिसू देऊ नका असे आदेश दिले होते

याच निर्णयाच्या विरोधात पुण्यात श्वान प्रेमींनी केलं आंदोलन

Aug 15, 2025 10:43 (IST)

Independence Day Live Updates: अदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण

महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड ग्राउंड वर झेंडावंदन संपन्न झाले. यावेळी जिलधिकारी किसन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद कार्यालय, पोलीस मुख्यालय चे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Aug 15, 2025 07:49 (IST)

PM Modi Speech LIVE: भारतीय सैन्याने शत्रूंना कल्पनेपलिकडील शिक्षा दिली: PM मोदी

गेल्या काही दिवसांपासून आपण ढगफुटी, भूस्खलन, पूर यासारख्या आपत्तींशी झुंजत आहोत. पीडितांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सहकार्याने काम करत आहे.

आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. सीमेपलीकडून पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या प्रकारचा नरसंहार केला, धर्म विचारून लोकांना मारण्यात आले. पतीला त्याच्या पत्नीसमोर गोळ्या घालण्यात आल्या. संपूर्ण भारत संतापाने भरला होता. या घटनेने संपूर्ण जगालाही धक्का बसला. ऑपरेशन सिंदूर ही त्या संतापाची अभिव्यक्ती आहे. २२ तारखेनंतर, आम्ही आमच्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. ते रणनीती ठरवू शकत होते, ते लक्ष्य ठरवू शकत होते, ते वेळ निवडू शकत होते आणि आमच्या सैन्याने अनेक दशकांपासून न केलेले काम केले. त्यांनी शेकडो किलोमीटर शत्रूच्या क्षेत्रात घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

Aug 15, 2025 07:45 (IST)

PM Modi Speech LIVE: सर्व संविधान निर्मात्यांना आदरपूर्वक नमन: PM मोदी

 स्वातंत्र्याचा हा उत्सव अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येक हृदय उत्साहाने भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला बळकटी देत आहे. १४० कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक घरात तिरंगा आहे - मग तो वाळवंट असो किंवा हिमालयाची शिखरे असोत किंवा समुद्रकिनारा असो किंवा लोकवस्तीचा प्रदेश असो, सर्व बाजूंनी एकच जल्लोष आहे, फक्त एकच घोषणा आहे, घोषणा आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय असलेल्या भूमीची आहे.

भारताचे संविधान बनवणारे अनेक महापुरुष, डॉ. राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, इतकेच नाही तर आपल्या महिला शक्तीचे योगदानही कमी नव्हते. सर्वांनी मिळून भारताचे संविधान शाश्वत बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाच्या संविधानाच्या निर्मात्यांना मी आदरपूर्वक नमन करतो.

Aug 15, 2025 07:41 (IST)

PM Modi Speech LIVE Updates: चहूबाजूला मातृभूमीचा जयघोष सुरु आहे: PM मोदी

प्रिय देशवासियांनो, आज आपण शामाप्रसाद मुखर्जी यांची जयंतीही साजरी करत आहोत. ते देशाच्या संविधानासाठी बलिदान देणारे पहिले महापुरुष होते. लाल किल्ल्यावर आज अनेक विशेष व्यक्ती उपस्थित आहेत. आज चहुबाजूला मातृभूमीचा जयघोष ऐकायला मिळत आहे.

Aug 15, 2025 07:38 (IST)

Independence Day Live Updates: PM मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि थोड्याच वेळात ते देशाला संबोधित करतील.

Aug 15, 2025 07:14 (IST)

Independence Day Live Updates: पंतप्रधान नरेेंद्र मोदी लाल किल्ल्यावर दाखल, महात्मा गांधींना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर दाखल,  राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन

Aug 15, 2025 07:13 (IST)

Independence Day Live Updates: PM मोदी लाल किल्ल्यावर दाखल

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा सोहळा.. पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल...

Aug 15, 2025 06:50 (IST)

Independence Day Live Updates: शक्तीपीठ महामार्गाला विरोध, शेतकरी झळकवणार शेतात तिरंगा

तिरंगा झळकतो आमच्या शिवारात!

शक्तीपीठ नको आमच्या वावरात!

१५ ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींवर तिरंगा झळकवून शक्तिपीठ महामार्गाचा जोरदार विरोध करूया.

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य

Aug 15, 2025 06:38 (IST)

Independence Day Live Updates: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, मनसेच्या बॅनरने लक्ष वेधलं

आपलं मत आपण दिलेल्या पक्षालाच पोचण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहो, स्वातंत्र्य दिनाच्या याच मत पूर्वक शुभेच्छा:  स्वातंत्र्यदिनी मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष मनीष पाथरे यांनी लालबाग परिसरात लावले बॅनर...

Aug 15, 2025 06:35 (IST)

Independence Day Live Updates: तापी नदीवर असलेल्या बॅरेकला आकर्षक विद्युत रोषणाई

राज्यासह देशात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहण्यास मिळत आहे शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे तापी नदीवर असलेल्या बॅरेकला पाटबंधारे विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईच्या माध्यमातून तिरंग्याची प्रतिकृती पाहण्यास मिळत आहे. धरणाच्या दरवाजावरून तिरंगी रोषणाईचे प्रतिबिंब पाण्यात मनमोहक दिसत असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहे.