Mumbai News: कबुतरांसाठी जैन समाज एकवटला! मनसेचा मात्र कडाडून विरोध, मंगलप्रभात लोढांना प्रत्यूत्तर

मुंबईतील कबुतरांवरील या कारवाईमुळे जैन समाज नाराज झाला असून याविरोधात रॅलीही काढण्यात आल्याचे समोर आले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: मुंबईमधील  कबूतर खाने सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबूतरखान्यावर (Kabutar Khana) कारवाई करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. परंतु स्थानिक रहिवाशांनी याला देखील विरोध केला आहे. मुंबईतील कबुतरांवरील या कारवाईमुळे जैन समाज नाराज झाला असून याविरोधात रॅलीही काढण्यात आल्याचे समोर आले आहे. 

बातों से मानेगा या लातों से! संजय दत्तला वठणीवर आणणाऱ्या स्वाती साठे निवृत्त

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे, ज्याला स्थानिकांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या या निर्णयावरुन जैन समाजामध्ये नाराजी पसरली आहे. तसेच मुंबईमधील कबुतरखाने सुरु राहावेत यासाठी जैन बांधवांकडून रॅलीही काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे राज्याचे कौशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांना पत्रही लिहले आहे. या पत्रामध्ये त्यांनी स्थानिकांची, प्राणी-पशुप्रेमींच्या मागणीचा विचार करावा अशी विनंती केली आहे. तसेच कबुतरांच्या आहारावर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर, कबुतरांना उपासमारीची अनेक उदाहरणे देखील समोर आली आहेत. यामुळे रस्त्यावर कबुतरांचा मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. 

तसेच  काल मी नॅशनल पार्कमध्ये कबुतरखान्याचे भूमिपूजन केले आहे. तिथे कोणीही राहात नाही. तिथे कबुतरखाना तयार होईल. आम्ही यासंदर्भात आयुक्तांना पत्र लिहितोय, मोकळ्या जागा अनेक ठिकाणी आहेत. आरे काॅलनी, रेसकोर्स, नॅशनल पार्क आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओपन स्पेस विकसित करावे. कबुतराचे देखील वैशिष्ट्य आहेत, ते नाॅनव्हेज घेत नाही, कचरा आणि इतर काही खात नाही, कबुतर मरु द्यायचे नाही ही आपली पण जबाबदारी आहे, असंही ते माध्यमांशी बोलताना म्हणालेत. 

Advertisement

( नक्की वाचा: पुण्यात वर्दीही असुरक्षित? गस्तीवरील पोलिसांना टोळक्याकडून मारहाण; गाडी अडवल्याचा राग अन्... )

दरम्यान, या मुद्द्यावरुन मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भूमिका स्पष्ट करत कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. निसर्गाच्या चक्राशी कोणी खेळू नये. प्रत्येक गोष्ट भावनेच्या दृष्टीने नाही तर विज्ञानाच्या दृष्टीने बघाव लागेल. सांस्कृतिक दहशतवाद करणे योग्य नाही.  न्यायालयाने विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे. त्यामुळे त्याचं पालन सुज्ञ नागरिकांनी केलं पाहिजे लोढा चांगला शिकलेला माणूस आहे त्यानीही विज्ञानाच्या अनुषंगाने विचार करावा, असं संदीप देशपांडे म्हणालेत.