मंगेश जोशी, जळगाव:
Jalgaon Banana Scam: जळगावमधून केळी विमा घोटाळ्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगावमध्ये केळी विम्यातून २५० कोटी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्षात केळी लागवड नसताना २७ हजार शेतकऱ्यांकडून विमान काढण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून सात दिवसांच्या आत खुलासा करावा लागणार आहे.
जळगावमध्ये सर्वात मोठा केळी विमा घोटाळा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमा योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. केळी लागवड नसतानाही हजारो शेतकऱ्यांच्या नावावर विमा काढण्यात आल्याचे समोर आले आहे. सुमारे 44 हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस लागवड दाखवत 250 कोटी रुपयांचा डल्ला मारण्याचा डाव असल्याचा कृषी विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघड झाल्याने सरकारचे सुमारे 179 कोटी रुपये वाचले असून 37 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
27,000 शेतकरी अडचणीत!
या प्रकरणी 48 सीएससी केंद्रांवरून बोगस फॉर्म भरण्यात आल्याची ही समोर आले असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त या सीएससी केंद्रांची पडताळणी करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या असून संबंधित शेतकऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून नोटीसा बजावण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत आपला खुलासा हा सादर करावा लागणार आहे.