मंगेश जोशी, जळगाव:
Jalgaon News: महाराष्ट्राच्या राजकारणात महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु होती. या निवडणुकीत अनेक जिल्ह्यांमध्ये राडा, मारहाण अन् आरोप प्रत्यरोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. जळगावमधून अशीच बातमी समोर आली असून जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे नगरपरिषद निवडणुकीच्या वादातून दोन गटात दगडफेक झाली आहे.
जळगावमध्ये दोन गटात राडा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे दोन गटात वादातून दगडफेक झाल्याची घटना घडली असून नगरपरिषद निवडणुकीच्या कामाच्या वादावरून दोन गटात वाद उफाळल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे. दगडफेकीत दोन्ही गटातील 16 ते 17 जण जखमी झाली असून जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेमुळे नशिराबाद मध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील परस्पर विरोधी 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BMC Election : मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली; सर्वाधिक भाजपचे, गुजराती किती?
दुसरीकडे, नाशिकरोड परिसरातील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद मोरे यांना मारहाण प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले माजी नगरसेवक पवन पवार यांच्यासह 12 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी जाऊन मारहाण करत निवडणुकीत झालेल्या खर्चापोटी 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. पवन पवार यांच्या आईचा शरद मोरे यांनी पराभव केला असून हा पराभव जिव्हारी न लागल्याने हे कृत्य करण्यात आले.