Jalgaon News: एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्या केल्याचा संशय
मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon News : जळगावच्या परधाडे ते पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात एक पुरुष, एक महिला आणि तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळला आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
तिघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिघांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पाचोरा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या तिन्ही मृतदेहांची ओळख पटवण्याचे आवाहन पाचोरा पोलिसांनी केले आहे.