Jalna News: भावा-भावाची भांडणं, लहान भावाने मोठ्याचा खून केला, कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

त्यानंतर त्याने दारू पिऊन लहान भाऊ दत्ता याच्याशी वाद घातला.

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

शेतीच्या वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. जालना तालुक्यातील पानशेंद्रा गावात ही घटना घडली आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. सचिन  सुधाकर पाचरणे (वय 32 वर्ष) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तर दत्ता सुधाकर पाचरणे (वय 22 वर्ष) असं आरोपी भावाचे नाव आहे. भावानेच भावाची हत्या केल्याने गावात वेगवेगळ्या चर्चा ही सुरू झाल्या आहेत.  

सचिन पाचरणे याला दारू पिण्याचे व्यसन होते.  त्यामुळे तो नेहमी शेतीच्या वाटणीचा विषय काढायचा. शिवाय त्यातून नियमित वाद करणे हे त्याचे काम होते. हा वाद अनेक वेळा विकोपाला जात होता. मोठ्या भावाच्या या वर्तवणुकीमुळे छोटा भाऊ दत्ता हा वैतागला होता. यातून वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहाला कंटाळून या दोघांचे वडील  सुधाकर पाचरणे यांनी जवळच्या नातेवाईकांना बोलून घेतले. ही मिटींग त्यांनी पानशेंद्रा या गावी बोलावली होती. 

नक्की वाचा - Exclusive : अख्खं गाव रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात, छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा गावात काय घडलं?

त्यानंतर नातेवाईक व कुटुंबीयांच्या समन्वयातून दोनही भावांना शेतीची वाटणी करून देण्यात आली. मात्र वाटणी पत्रासाठी सचिन हा रजिस्ट्री कार्यालयात आलाच नाही. त्यानंतर त्याने दारू पिऊन लहान भाऊ दत्ता याच्याशी वाद घातला. या वादाचे पर्यावरण हाणामारीत झाले. यावेळी मोठा भाऊ सचिन याने लहान भावाला मारण्यासाठी लाकडी दंडा आणला. झटापटीत लहान भाऊ दत्ता याने तो लाकडी दांडा हिसकावून घेत मोठ्या भावाला मारहाण केली. 

नक्की वाचा- NCP Crisis: 'राष्ट्रवादीच्या फुटीआधी भाजपशी चर्चा..', अजित पवार गटाची पहिल्यांदाच मोठी कबुली

यात गंभीर जखमी झालेल्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी घटनेचा जलद गतीने तपास करून आरोपी दत्ता पाचारणे यास तात्काळ अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अधिक तपास तालुका जालना पोलीस करीत आहेत.

Advertisement