KDMC Election: कल्याण डोंबिवलीत मोठा ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, सत्तेची समीकरणे काय?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट, मनसे, काँग्रेस, ठाकरेंचे बंडखोर आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नगरसेवकांची मोट बांधून सत्तेत येण्यासाठी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी ताकद लावली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण:

Kalyan Dombivli Municiple Corporation Election 2026: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजपने अंबरनाथमध्ये शिंदे गटाला डावलून सत्तेत वाटा मिळवल्यानंतर आता शिंदेंनीही वचपा काढण्याची तयारी केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट, मनसे, काँग्रेस, ठाकरेंचे बंडखोर आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नगरसेवकांची मोट बांधून सत्तेत येण्यासाठी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी ताकद लावली आहे. 

Mumbai Mayor News: ठाकरेंच्या या 2 नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर; काय आहे कारण?

कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे शिंदेगटाला समर्थन..

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निकालानंतर आज शिवसेना नगरसेवकांचा गट स्थापन करण्यासाठी शिवसेना नेते श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के कोकण भवन येथे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत मनसेचे माजी आमदार राजू पाटीलही आपल्या नगरसेवकांसोबत उपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण डोंबिवलीत एकत्रित गट स्थापन करणार असल्याची शक्यता आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे 5,  दोन काँग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १ नगरसेवक अशी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे आम्हाला पाठिंबा देत आहे, अशी थेट घोषणाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. 

(नक्की वाचा-  मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)

दरम्यान, कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेबाबत मात्र अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, एकनाथ शिंदे यांची बैठक होईल. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचाच महापौर बसेल. आम्ही भाजपला बाहेर ठेवणार नाही, असेही यावेळी श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केले. 

Advertisement